शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या बसवरील कंडोमची जाहिरात हटविणार

By admin | Updated: March 2, 2017 21:42 IST

गोव्यातील बालरथांवरील म्हणजेच शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याची प्रक्रिया कदंब वाहतूक महामंडळाने

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 02 -  गोव्यातील बालरथांवरील म्हणजेच शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याची प्रक्रिया कदंब वाहतूक महामंडळाने सुरू केली आहे. मात्र, कदंब बसगाड्यांवर असलेली जाहिरात काढण्याच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्यापूर्वी आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती महामंडळाने गोवा राज्य महिला आयोगाला केली आहे.कदंबच्या बसगाड्यांवर आणि बालरथांवरही कंडोमच्या जाहिराती आहेत. त्यात एका महिलेचेही आक्षेपार्ह छायाचित्र आहे. ही जाहिरात काढून टाकली जावी, अशी मागणी रणरागिणी या महिला संस्थेने काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे निवेदनाद्वारे केली होती. आयोगाने कदंब महामंडळास तत्काळ पत्र पाठविले व जाहिराती हटविण्याची सूचना केली. महामंडळास आयोगाचे पत्र काल गुरुवारी मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बालरथांवर कंडोमची जाहिरात असू नये, या सूचनेचे तत्काळ पालन करण्यासाठी महामंडळाने पावले उचलली. संबंधित जाहिरात कंपनीला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ती जाहिरात काढण्यास सांगितले व त्यासाठी कंपनीही तयार झाली. जाहिरात तत्काळ हटवू, असे कंपनीने महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घाटे यांनी गुरुवारी लोकमतला सांगितल की कदंब बसगाड्यांवरील जाहिरात ही टीव्हीवरही झळकते व राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांमध्येही ती असते. शिवाय कदंब गाड्यांवर ती जाहिरात लावणे हे बेकायदा नव्हे. कदंबच्या बसगाड्या सार्वजनिक ठिकाणी असतात व त्यामुळे अशा प्रकारची जाहिरात ही महिला प्रवाशांसाठी अपमानास्पद ठरते, त्यामुळे त्या काढून टाकल्याच पाहिजेत, असे रणरागिणी संस्थेचे म्हणणे आहे. (खास प्रतिनिधी)