शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

डॅनियलीसाठी गोवा शेवटचे ‘अ‍ॅडव्हेंचर’

By admin | Updated: March 17, 2017 03:13 IST

फेब्रुवारीच्या २२ तारखेला लिव्हरपूलहून भारताच्या दौऱ्यावर निघालेल्या ‘बॅगपॅकर’ डॅनियली मेक्लॉगलिनने आपल्या फेसबुक पेजवर शेवटची पोस्ट टाकली.

सुशांत कुंकळयेकर, काणकोणफेब्रुवारीच्या २२ तारखेला लिव्हरपूलहून भारताच्या दौऱ्यावर निघालेल्या ‘बॅगपॅकर’ डॅनियली मेक्लॉगलिनने आपल्या फेसबुक पेजवर शेवटची पोस्ट टाकली. त्यावेळी तिला कदाचित माहितीही नसेल, तिचे हे आयुष्यातील शेवटचे ‘अ‍ॅडव्हेंचर’ असू शकेल. ती भारत दौऱ्यावर जाताना तिच्या घरच्यांनीही तिला हसतमुखाने निरोप दिला होता; मात्र अवघ्या २0 दिवसांनी गोव्यात तिचा खून झाल्याची बातमी तिच्या घरच्यांना मिळाली. ही बातमी तिची आई अँड्रिया ब्रांगेरिया हिच्यासाठी अविश्वसनीय होती.डॅनियली मेक्लॉगलिन या २८ वर्षीय आयरिश युवतीच्या खून प्रकरणामुळे केवळ गोवाच नव्हे, तर ब्रिटनही हादरुन गेले आहे. ज्याच्यावर डॅनियलीने मित्र म्हणून विश्वास टाकला, त्या विकट भगतनेच बलात्कार करुन गळा आवळून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी भगतवर बलात्कारासह खुनाचा गुन्हाही दाखल केला आहे. मयत डॅनियलीच्या मोबाईल व नोटपॅडसह ज्या वस्तू गायब झाल्या आहेत, त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.डॅनियली गेल्या वर्षी काणकोणात आली होती. त्यावेळीच तिची विकटशी मैत्री जमली होती. फेसबुक व इतर माध्यमांतून त्यांचा वर्षभर संपर्क चालूच होता. १२ मार्च रोजी होळीचा आनंद लुटण्यासाठी एका ब्रिटिश मैत्रिणीबरोबर ती काणकोण येथे आली. दुसऱ्या दिवशी दुपारपासून ती विकटबरोबरच होती. त्यांचे मद्यपान चालूच होते. दुपार ते रात्रीपर्यंत त्यांनी किमान चार जागा बदलल्या. रात्री नऊच्या सुमारास विकट व डॅनियली ओवरे-काणकोण येथील ग्रीनपार्क शॅकजवळ दिसले. त्यानंतर विकट तिला राजबाग येथील त्या सुनसान जागेत घेऊन गेला असावा. त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच तिने प्रतिकार केला. डॅनियली पोलिसात तक्रार देईल, या भीतीनेच विकटने तिचा खून केला असावा, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.