शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे मासळीवाहू ट्रक कारवारमध्ये अडविले; स्थानिक मच्छिमारांचा एफडीए अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 21:58 IST

मासळी आयातीवरील निर्बंधांच्या वादाने शुक्रवारी नवे वळण घेतले. कारवारहून आणलेली मासळी जप्त करुन एफडीए अधिका-यांनी ती नष्ट केल्याने येथील मच्छिमारांनी बांबोळी येथे एफडीए अधिका-यांना घेराव घातला .

पणजी : मासळी आयातीवरील निर्बंधांच्या वादाने शुक्रवारी नवे वळण घेतले. कारवारहून आणलेली मासळी जप्त करुन एफडीए अधिका-यांनी ती नष्ट केल्याने येथील मच्छिमारांनी बांबोळी येथे एफडीए अधिका-यांना घेराव घातला तर दुसरीकडे कारवारच्या मच्छिमारांनी गोव्यातून गेलेले मासळीचे ट्रक तेथे अडविले आणि ट्रकना आग लावण्याची धमकी दिली. यामुळे मासळीचा हा विषय पुन: चिघळला आहे. 

मालिम येथील मांडवी फिशरमेन्स को आॅपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य असलेल्या ५0 ते ६0 मच्छिमारांनी काल सकाळी बांबोळी येथील एफडीए कार्यालयावर धडक दिली. गोव्यापासून ६0 किलोमिटर अंतरात असलेल्या आणि तासाभरात गोव्यात पोचणा-या शेजारी राज्यातील मासळीला एफडीएच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार होती त्याचे काय झाले, असा या मच्छिमारांचा सवाल होता. कारवारहून आलेले मासळीचे ट्रक अडविले जात आहेत आणि त्या मच्छिमारांना त्रास दिला जात आहे, अशा तक्रारी असल्याचे निदर्शनास आणले. परंतु याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मच्छिमारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. कारवारचे मासळी व्यापारी त्यांची वाहने गोव्यात अडविली जात असल्याने संतप्त बनले आहेत. त्यांनी गोव्याची मासळीवाहू वाहने अडविण्याचे सत्र आरंभले आहे. 

दबावाखाली झुकणार नाही : आरोग्यमंत्री दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोणी कितीही घेराव घातले आणि एफडीए कार्यालयासमोर निदर्शने केली तरी जनतेच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. एफडीएचे नियम मासळी व्यापाºयांना पाळावेच लागतील, असा इशारा दिला. ते म्हणाले की, ६0 किलोमिटर अंतरात असलेल्या छोट्या मासळी व्यापा-यांबाबत सहानुभूती आहे परंतु मोठ्या व्यापाºयांनी या सवलतीचा लाभ घेऊ नये याची दक्षता घ्यावी लागले. छोट्या व्यापा-यांसाठी जी मुभा द्यायची आहे त्याबद्दल अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरी बाब म्हणजे गोव्यातून मासळी निर्यात करणा-यांनाही एफडीएचे नियम लागू होतील. 

टॅग्स :goaगोवा