शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या वीज मंत्र्यांना ब्रेन स्ट्रोक, कोकिलाबेनमध्ये उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 11:31 IST

पणजी : गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी रात्री उशिरा मुंबई येथे ब्रेन स्ट्रोक आला. मंगळवारी सकाळी मुंबईतील कोकीळाबेन इस्पितळात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी मंगळवारी भाजपच्या पणजीतील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी जाहीर केले. यावेळी भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.गोव्याचे ...

पणजी : गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी रात्री उशिरा मुंबई येथे ब्रेन स्ट्रोक आला. मंगळवारी सकाळी मुंबईतील कोकीळाबेन इस्पितळात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी मंगळवारी भाजपच्या पणजीतील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी जाहीर केले. यावेळी भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हेही उपस्थित होते.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हे अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांनी अमेरिकेहून मंत्री मडकईकर यांना काल सायंकाळी पाचच्या सुमारास फोन केला होता. मडकईकर त्यावेळी मुंबईत होते. मडकईकर सोमवारी दुपारी मुंबईला गेले होते. तिथून ते मंगळवारी दिल्लीला जाणो अपेक्षित होते. गोव्यात सध्या वीज समस्येने कहर केलेला आहे व लोकांकडून वीज खात्यावर बरीच टीका होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेहून सोमवारी सायंकाळी फोन करून मडकईकर यांना वीज खात्याच्या अभियंत्यांची बैठक घेण्याची सूचना केली होती. मडकईकर यांनी बुधवारी अभियंत्यांची आपण बैठक बोलवत असल्याचे मुंबईहून लोकमतला सांगितले होते. तोर्पयत मडकईकर यांची प्रकृती ठीक होती. मडकईकर यांना रात्री अस्वस्थ वाटू लागले. मडकईकर ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या हॉटेलला त्यांनी रात्री बाराच्या सुमारास कळविले. आपल्याला बरे वाटत नसल्याची कल्पना त्यांनी हॉटेलमधील कर्मचा:यांना देताच हॉटेलच्याच वाहनाने त्यांना मुंबईच्या कोकीळाबेन इस्पितळात नेण्यात आले. तिथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे स्पष्ट झाले व सकाळी त्यांच्यावर श क्रिया पार पडली.

दरम्यान, आरोग्य मंत्री राणो यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा राणो म्हणाले की आपण स्वत: व गोवा सरकारच्या गोमेकॉ इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक मंगळवारी मुंबईतील इस्पितळात जात आहोत. आम्ही मडकईकर यांची भेट घेऊ. मडकईकर यांच्यावरील श क्रिया यशस्वी झाल्याचे मुंबईच्या इस्पितळातील डॉक्टरांनी मला सांगितले आहे. मडकईकर हे निश्चितच बरे होऊन येतील. गोव्यात वीज समस्येबाबत रविवारी जे काही घडले त्याबाबत आम्ही दिलगिर आहोत. पुन्हा असे काही घडणार नाही. मुख्यमंत्री र्पीकर यांनी अमेरिकेहून गोव्यातील वीज समस्येवर आता देखरेख ठेवली आहे.