शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रिक्स’ शिखर परिषदेमुळे गोव्याला छावणीचे स्वरूप!

By admin | Updated: October 12, 2016 05:45 IST

‘चोगम’नंतर गोव्यात होणारी पाच राष्ट्रांच्या ‘ब्रिक्स शिखर परिषद’साठी मोबोर व केळशी या दोन्ही भागांत कडेकोट सुरक्षा तैनात केली असून परिषदेचे ठिकाण असलेल्या मोबोरच्या

सुशांत कुंकळयेकर / गोवा‘चोगम’नंतर गोव्यात होणारी पाच राष्ट्रांच्या ‘ब्रिक्स शिखर परिषद’साठी मोबोर व केळशी या दोन्ही भागांत कडेकोट सुरक्षा तैनात केली असून परिषदेचे ठिकाण असलेल्या मोबोरच्या ‘हॉटेल लिला’पासून सहा कि.मी. अंतरावरच्या केळशी किनाऱ्यावर सीमा सुरक्षा दलांच्या टेहळणी तोफा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. किनारपट्टी सुरक्षेला अधिक महत्त्व दिले आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. ‘लोकमत’च्या टीमने मंगळवारी या परिसराची पाहणी केली असता, अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या परिषदेच्या आयोजनाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. केळशी किनाऱ्यावर सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी तैनात केली आहे. समुद्र किनाऱ्यावर देशी-विदेशी पर्यटक आणि त्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर तैनात असलेले सैनिक असे चित्र या किनाऱ्यावर दिसत होते.लीला हॉटेलमध्ये मुख्य परिषद होणार असून जवळच्या रामाडा आणि अन्य हॉटेलमध्येही ब्रिक्सचे प्रतिनिधी उतरणार आहेत. या परिषदेनिमित्त किमान हजारभर प्रतिनिधी गोव्यात येणार असून या सर्वांच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसेच केंद्रीय राखीव दलाच्या एकूण १0 तुकड्या दाखल झाल्या आहेत.स्थानिकांसाठी ‘पास’ : १४ ते १६ आॅक्टोबर या तीन दिवसात विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह हजारो ब्रिक्सचे प्रतिनिधी केळशी-मोबोर भागात येणार असल्यामुळे स्थानिकांच्या हालचालीवर निर्बंध येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र स्थानिकांवर कुठलेही निर्बंध आणले जाणार नाहीत, असे आश्वासन दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी दिले. स्थानिकांच्या हालचालीवर निर्बंध येऊ नयेत, यासाठी त्यांना खास पास दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.वास्तविक मुख्य परिषद जरी पाच राष्ट्र प्रमुखांची असली तरी एकूण ११ राष्ट्रांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित रहाणार आहेत. त्याशिवाय जगभरातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या तीन दिवसात गोव्यात ठाण मांडून असणार आहेत.मंगळवारी दूरदर्शनची भली मोठी टीम मोबोर परिसरात दाखल झाली होती. एक-दोन दिवसांतच या प्रसारणांसाठी दूरदर्शनची यंत्रणा सज्ज होईल, अशी माहिती संबंधितांकडून मिळाली.