शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोवा महिला फुटबॉल महोत्सव : तिबेट संघाचा ६-०ने पराभव

By admin | Updated: May 8, 2016 19:38 IST

म्हापसा येथील धुळेर मैदानावर झालेल्या गोवा फुटबॉल महोत्सव स्पर्धेचे विजेतेपद गोवा इलेव्हन संघाने पटकाविले.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 8- म्हापसा येथील धुळेर मैदानावर झालेल्या गोवा फुटबॉल महोत्सव स्पर्धेचे विजेतेपद गोवा इलेव्हन संघाने पटकाविले. त्यांनी अंतिम सामन्यात तिबेट महिला फुटबॉल संघावर ६-० ने मात केली. गोव्याच्या सौम्या मुकुंदनने हॅटट्रिक नोंदवली. तिने २४, ३३ आणि ४६ व्या मिनिटाला गोल नोंदवले. वेलंका डिसोझाने ७व्या आणि २०व्या मिनिटाला गोल नोंदवला. तिबेटच्या टेंझिन यांगझोमने १७ व्या मिनिटाला स्वंयगोल नोंदवला. त्यामुळे गोवा इलेव्हन संघाला ६-० असा मोठा विजय नोंदवता आला. सामन्यावर सुरुवातीपासून गोवा इलेव्हन संघाचे वर्चस्व दिसून आले. हा सामना रोमांचक होईल असे वाटत होते. मात्र गोवा इलेव्हनच्या सौम्याने तिबेट संघाला जबर धक्के दिले. सातव्या मिनिटाला वेलंकाने गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली होती. हा पास तिला सिन्ना लोबो हिने दिला होता. त्यानंतर १७ व्या मिनिटाला टेंझिनचा आत्मघाती गोल गोवा इलेव्हन संघाला २-० अशी आघाडी मिळवून देणारा ठरला. त्यानंतर वालंका डिझोझाने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन करीत संघाचा तिसरा गोल नोंदवला. तिबेटचा बचाव भेदत तिने गोलजाळ्यात शानदार पद्धतीने चेंडू ढकलला. प्रतिस्पर्धी संघाची कर्णधार गोल नोंदवण्याचे प्रयत्न करीत होती. मात्र गोवा इलेव्हनचा बचाव भेदण्यात तिला यश आले नाही. त्यानंतर सौम्या हिने खेळाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. तिने २४, ३३ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. तिच्या या आघाडीमुळे गोवा इलेव्हन संघात जोश भरला होता. अखेर सौम्याने स्वत:चा तिसरा गोल नोंदवत हा विजय पक्का केला. बक्षीस वितरण समारंभास म्हापसा पालिका उपाध्यक्ष मर्लिन डिसोझा, गोवा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष लाविनो रिबेलो, ज्युलियानाकुलासो, पीटर वाल्स, राहुल रॉड्रिग्स आदी मान्यवर उपस्थित होते.