शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात किनारपट्टीपेक्षा डोंगर भागात पावसाचा जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 21:21 IST

केपे, सांगे, सत्तरी या गोव्याच्या पूर्वेकडील तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. किनारपट्टीपासून लांब असलेल्या डिचोली तालुक्यातही जोरदार पाऊस पडला.

- वासुदेव पागी

पणजी: मान्सूनच्या सामान्य प्रमाणापेक्षाही ८ टक्के अधिक सरासरी पाऊस यंदा राज्यात कोसळला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार  सांगे, केपे, सत्तरी आणि डिचोलीत सर्वाधिक पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे पाहता किनारपट्टीपेक्षा डोंगरकडे अधिक बरसले आहेत. पावसाचा जोर किनारपट्टी भागापेक्षा पश्चिम घाटाकडे अधिक दिसत आहे. केपे, सांगे, सत्तरी या गोव्याच्या पूर्वेकडील तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. किनारपट्टीपासून लांब असलेल्या डिचोली तालुक्यातही जोरदार पाऊस पडला. फोंड्यातील पाऊस शनिवारी हवामान खात्याकडे उपलब्ध नव्हता.  सर्वाधिक पाऊस सांगेत ८६ इंच एवढा झाला आहे. केपेत ८४ इंच वाळपईत ८५ इंच तर डिचोली तालुक्यातील साखळी केंद्रात ८० इंच पाऊस नोंद झाला आहे.  या उलट किनारपट्टीतील भागात काणकोणात ७० इंच, मुरगावात ७६ इंच,  दाबोळीत ७८ इंच,  पणजीत  ७६ इंच  आणि पेडणेत ७८ इंच एवढा पाऊस पडला आहे. आतापर्यंत राज्यात ७८ इंच एवढा सरासरी पाऊस पडला आहे. मान्सूनच्या सामान्य प्रमाणापेक्षा तो ८ टक्के अधिक आहे. जुलै महिन्याच्या २७ तारखेपर्यंत मान्सूनचे सामान्य प्रमाण आहे ७४ इंच. म्हणजेच सामान्य प्रमाणापेक्षा ८ इंच अधिक पाऊस यंदा पडला आहे. मागील दहा वर्षांच्या पावसाच्या प्रमाणाचा अभ्यास करून भारती हवामान खात्याकूडन पावसाचे सामान्य प्रमाण ठरविले जाते. यंदा जून पैक्षा जुलै जोरदार बरसला. जूनमध्ये मृगधारा फार कोसळल्या नाहीत, परंतु  जूनचा उत्तरार्ध जोरदार पावसाचा ठरला. जून महिन्यात ३० इंच एवढा पाऊस पडला. जुलै महिन्यात 48 इंच पाऊस पडला. जुलै महिन्याची सुरूवातही  जोरदार पावसाने झाली, पहिल्या तीन आठवड्यातही जोरदार पाऊस पडला आणि अता शेवटचा आठवडाही एखाद्या दिवसाची विश्रांती घेऊन पाऊस झोडपतच असतो. 

सर्व २७ दिवस पाऊसजुलै महिन्यात यंदा धो धो पाऊस पडला. १ जुलै पासून २७ जुलै पर्यंत एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी पाऊस पडला नाही. हवामान खात्याच्या वेबसाईटवरील आलेखानुसार या महिन्यात २४ तासात सर्वात अधिक पाऊस  ४.७ इंच एवढा पाऊस ११ जुलै रोजी नोंदला गेला आहे. त्यानंतर २४ जुलै रोजी ४.३ एवढा नोंदला गेला आहे. सर्वात कमी पाऊस १८ जुलै रोजी ५ मिलिमीटर एवढा नोंदला गेला आहे.

टॅग्स :goaगोवा