शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवा कर्नाटकला वरचढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कडिचोली : तब्बल २६ दिवस कर्नाटकच्या साक्षीदाराची उलटतपासणी करताना गोव्याच्या टीमने लवादासमोर म्हादई प्रश्नी कर्नाटकला

लोकमत न्यूज नेटवर्कडिचोली : तब्बल २६ दिवस कर्नाटकच्या साक्षीदाराची उलटतपासणी करताना गोव्याच्या टीमने लवादासमोर म्हादई प्रश्नी कर्नाटकला सपशेल उघडे पाडले. साक्षीदार डॉ. ए.एस. गोसाईन यांना विविध मुद्द्यांवर घेरण्यात गोव्याला यश आले. बुधवारपासून दुसरे साक्षीदार ए. के. बजाज यांची उलटतपासणी गोव्याने सुरू केली असून त्यांना घेरण्यासाठी जय्यत तयारी केल्याचे दिल्लीतून सांगण्यात आले. गोसाईन यांनी २६ दिवसांच्या लवादासमोरील उलटतपासणीत अनेक बाबतींत चुकीची आकडेवारी, खोटी माहिती, केंद्रीय जल आयोगाचा अहवाल, पाण्याची उपलब्धता, २०१५, २०१६, २०१७ चा अहवाल याबाबत तिन्ही वर्षांची दिलेली माहिती व आकडेवारी विपर्यास करणारी असल्याने या उलटतपासणीत कर्नाटकला मोठा धक्का बसलेला आहे. लवादाने या खोट्या माहितीची गंभीर दखल घेतली आहे. बुधवारपासून नवीन साक्षीदार ए.के. बजाज यांची साक्ष सुरू झालेली असून त्यांनाही घेरण्यासाठी गोव्याने शिस्तबद्ध रणनीती आखल्याचे सांगण्यात आले. आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लवंदे, प्रताप वेणुगोपाल, पंकज पै वेर्णेकर, साल्वादोर रिबेलो, अमोघ प्रभुदेसाई, चेतन पंडित, प्रेमानंद कामत, एस. पाटील, गोपिनाथ देसाई, सुरेश आदींनी गोव्याची बाजू अधिकच प्रभावीपणे संघटितपणे लावून धरताना कर्नाटकच्या साक्षीदाराला सपशेल उघडे पाडले असून त्यामुळे कर्नाटकलाही फटकार बसली आहे. लवादाच्या त्रिसदस्यीय टीमने देखील गोव्याच्या भूमिकेनंतर कर्नाटकाला वारंवार फैलावर घेत त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिल्याने सध्या गोव्याची बाजू अधिकच भक्कम होताना दिसत आहे. दरम्यान, कर्नाटकच्या अरेरावीमुळे कणकुंबी येथे कळसा कालव्याच्या कामाच्या ठिकाणी भयानक स्थिती असून रस्ते वाहून गेले. कालवे खचल्याने व कालव्यात वाहन कोसळल्याने स्थिती दयनीय झाली आहे.