शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : 'मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा' च्या शिष्टमंडळाने घेतली डॉ. किरीट सोलंकी यांची भेट

By समीर नाईक | Updated: June 11, 2023 14:48 IST

गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी डॉ. सोलंकीचे या शिष्टमंडळाने आभार मानले. 

पणजी: 'मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा' च्या शिष्टमंडळाने शनिवारी एससी/एसटी कल्याणासाठी संसदीय समितीचे अध्यक्ष डॉ. किरीट सोलंकी यांची गुजरातमधील अहमदाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेट घेतलेल्या 'मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा' च्या शिष्टमंडळात अध्यक्ष अ‍ॅड. जॉन फर्नांडिस, सचिव रूपेश वेळी, प्रवक्ते गोविंद शिरोडकर आणि रवींद्र वेळीप यांचा समावेश होता. गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी डॉ. सोलंकीचे या शिष्टमंडळाने आभार मानले. 

डॉ. सोलंकी यांनी ११ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीत इतर २९ खासदारांसह गोव्याला दिलेल्या अभ्यास दौऱ्यात गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी कलम ३३० अन्वये अंतर्गत  एससी/एसटी साठी जागा राखीव ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गोवा सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यांच्या सूचनांच्या आधारे, राज्य सरकारने गोवा राज्यासाठी सीमांकन आयोग कायदा, अंतर्गत सीमांकन आयोग स्थापन करण्याच्या शिफारशीसह कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला. 

शिष्टमंडळाने अहमदाबादच्या सध्याच्या भेटीत यांना प्रस्तावाच्या प्रती सादर केल्या ज्या गोवा सरकारने सरकारला पाठवल्या आहेत. याबाबत आपण केंद्र सरकारकडे वैयक्तिकरित्या पाठपुरावा करू, तसेच आणि संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार आहे जेणेकरून गोव्यासाठी परिसीमन आयोगाची स्थापना केली जाईल, गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी सध्याच्या सरकारच्या या कार्यकाळात म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा राखीव ठेवल्या जातील, असे आश्वासन डॉ. सोलंकी यांनी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :goaगोवा