शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
3
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
6
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
7
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
8
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
9
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
10
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
11
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
12
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
13
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
14
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
15
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
16
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
17
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
18
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
19
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
20
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवा अजून सुरक्षित, कोरोनाचा फैलाव नाही : मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 19:41 IST

गोव्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे.

पणजी : राज्याच्या सीमा सील केल्यामुळे गोव्यात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. गोवा अजून सुरक्षित आहे असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

गोव्यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती सुधारत आहे. त्यांच्या संपर्कातील अनेकांना निगराणीखाली ठेवले आहे. गोव्यात आता मोठ्या प्रमाणात कसलाच तुटवडा नाही. फक्त औषधांचा तुटवडा आहे. त्यावरही उपाय काढला जाईल. अन्न धान्याचा पुरवठा सुरु झाला आहे. आमदारांना मतदारसंघात लोकांना धान्य वाटणे सुरक्षित व्हावे म्हणून चाळीसही आमदारांच्या प्रत्येकी दोनशे कार्यकर्त्यांना आम्ही पास दिले. त्यामागे काही राजकारण नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात 268 टन भाजी फलोत्पादन विकास महामंडळाने उपलब्ध केली आहे. महामंडळाच्या 1200 दालनांमधून विक्री सुरू झाली आहे. मजुरांचीही काळजी आम्ही घेत आहोत. मी स्वतः पेडे येथे मजुरांच्या कॅम्पला भेट दिली व समस्या जाणून घेतल्या. काहीजणांना त्यांच्या गोव्यातीलच खोलीवर जाऊन रहायचे आहे त्याना जाऊ दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले 

 जिल्हा मिनरल निधीतून 52 कोटी रुपये खर्च करू कोरोनाविरोधी उपाययोजनांसाठी  सरकार जिल्हा मिनरल निधीतून 52 कोटी रुपये खर्च करील. केंद्रीय खाण मंत्रालयाने सर्व राज्यांना तशी सूचना केली आहे. त्यापैकीच सोळा कोटी रुपये खर्चून 200 वेन्टीलेटर्स खरेदी केले जातील. आमच्याकडे 40 वेन्टीलेटर्स आहेत असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

देऊळांनी मदत करावी राज्यातील देऊळांकडे प्रचंड पैसा आहे. मंदिरांनी आता कोरोनाविरोधी लढ्यात मोठे योगदान द्यावे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी कोविद फंडात जमा करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  गिरण्या सुरु कराराज्यातील पिठाच्या गिरण्या बंद आहेत. त्यांनी त्या सुरू कराव्यात असेही आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.