शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Goa: धक्कादायक: दिड वर्षाच्या चिमुरडी मुलीचा समुद्रात बुडून मृत्यू

By पंकज शेट्ये | Updated: May 30, 2024 21:45 IST

Goa News: खारीवाडा किनाऱ्यावर राहणाऱ्या एका कुटूंबातील दीड वर्षीय चिमुकल्या मुलीचा खारीवाडा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी (दि.३०) संध्याकाळी घडली. ती चिमुकली मुलगी घराच्या परिसरात खेळताना अचानाक सर्वांची नजर चुकवीत समुद्रात गेल्यानंतर तेथे बुडायला लागली.

- पंकज शेट्ये  वास्को - खारीवाडा किनाऱ्यावर राहणाऱ्या एका कुटूंबातील दीड वर्षीय चिमुकल्या मुलीचा खारीवाडा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी (दि.३०) संध्याकाळी घडली. ती चिमुकली मुलगी घराच्या परिसरात खेळताना अचानाक सर्वांची नजर चुकवीत समुद्रात गेल्यानंतर तेथे बुडायला लागली. लहान मुलगी बुडत असल्याचे तेथे असलेल्या लोकांना दिसून येताच त्यांनी तिला बाहेर काढल्यानंतर इस्पितळात नेले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वास्को पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास ती दुर्देवी घटना घडली. वास्को, खारीवाडा येथील किनाऱ्यावर त्या चिमुकल्या मुलीचे कुटूंब तिच्यासोबत राहते. गुरूवारी संध्याकाळी ती चिमुरडी घराच्या बाहेर किनाऱ्यावर खेळत होती. त्यावेळी तेथे तिची आई होती अशी माहीती पोलीसांकडून मिळाली. दिड वर्षाची मुलगी खेळता खेळता अचानाक तिने आईची नजर चुकवीत ती समुद्रात जाऊन पोचली. समुद्रात पोचल्यानंतर तेथे ती बुडायला लागली. लहान मुलगी समुद्रात बुडत असल्याचे तेथे असलेल्यांना दिसून येताच त्यांनी त्वरित धाव घेऊन मुलीला बाहेर काढले. बुडाल्याने मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला त्वरित वास्कोतील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वास्को पोलीसांना घटनेची माहीती मिळाताच पोलीस निरीक्षक कपील नायक, पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पाटील आणि इतर पोलीसांनी तेथे त्वरित धाव घेतली. ती घटना कशी घडली त्याबाबत पोलीसांनी माहीती घेतली. तसेच पोलीसांनी चिमुरडीच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील जिल्हा इस्पितळाच्या शव गृहात पाठवून दिला आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाdrowningपाण्यात बुडणे