शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाताळासाठी गोवा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:28 IST

उद्या २५ डिसेंबर रोजी जगभर साजरा होणाऱ्या नाताळ सणाची पूर्वतयारी गोवाभर पूर्ण झाली आहे.

 

म्हापसा : नाताळ सणाच्या स्वागतासाठी पूर्ण गोवा सज्ज झाला आहे. गावात, शहरात नाताळाचे वातावरण तयार झाले आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माची त्याच्या स्वागताची तयारी सर्वत्र पूर्ण झाली आहे. आता फक्त प्रतिक्षा लागून राहिली आहे ती मध्यरात्री होणाºया प्रार्थना सभाची. सणा निमित्त देश-विदेशातून पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

उद्या २५ डिसेंबर रोजी जगभर साजरा होणाºया नाताळ सणाची पूर्वतयारी गोवाभर पूर्ण झाली आहे. सणाचा माहोल सर्वत्र तयार झाला आहे. सणाचे प्रतिक असलेल्या आकर्षक विविध प्रकाराच्या आकाराच्या पारंपारिक नक्षत्रांच्या सजावटीतून परिसर फुलून गेला आहे. गोठ्यात जन्म घेतलेल्या येशू ख्रिस्ताच्या गोठ्याचे आकर्षक असे देखावे सर्वत्र तयार करण्यात आले आहेत. जागोजागी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने गावे, शहरे न्हावून गेली आहेत. मध्यरात्री होणाºया प्रार्थना सभांची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. प्रत्येकगावातील शहरातील चर्चीत प्रार्थना सभांचे आयोजन सणानिमित्त केले जाते.  संबंधीत चर्चीतील धर्मगुरूंच्या (पाद्री) मार्गदर्शनाखाली प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. प्रार्थना सभांच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक नृत्याच्या कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. नाताळाच्या दिवसापासून ते नवीन वर्षापर्यंत चर्चच्या परिसरात भरगच्च असे विविध प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा केले जातात. नाताळाच्या दिवशी सांताक्लॉजचे आगमन सर्वत्र होते.  

नाताळातील वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून प्रत्येक गावातील वाड्यावरुन दर दिवशी कॅरल संगीताच्या धुनीने मिरवणुकी काढण्यात आलेल्या. या मिरवणुकीत लहानांपासून ते जेष्ठापर्यंत सहभागी झाले होते. डोक्यावर लाल रंगाच्या टोप्या, हातात कंदील व तोंडात कॅरल गीतांचे स्वर असे त्याचे स्वरुप असते. मिरवणुकीच्या अग्रस्थानाचा मान चर्चेच्या पाद्रींना देण्यात आलेला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या मिरवणुका काढल्या जातात.

एकात्मतेचे प्रतीक असलेल्या समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रीत आणणारा, धार्मिक एकात्मतेबरोबर एकमेकांशी असलेले सलोख्याचे नाते हीतसंबंध ऋणानुबंध जपणाºया या नाताळ समा निमित्त नक्षत्रांच्या स्पर्धा, गोठ्यांच्या स्पर्धा ख्रिसमस ट्री तसेच कॅरोल गीत गायनांच्या स्पर्धा सुद्धा भरवल्या जातात. आकर्षक बक्षिसे दिली जातात. या सणाचे हे विशेष असे आकर्षण सुद्धा असते. सणाला लागणारे विविध पदार्थ खास करुन करंजा, बिबींक, धोदोल सारखे पदार्थ घरा घरातून बनवण्यात आले आहेत.