शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: निहाल बेग, टोनी स्नॉक्सेल ठरले आयर्नमॅन

By समीर नाईक | Updated: October 8, 2023 17:01 IST

Goa News: रविवारी येथे आयोजित आयर्नमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेला उत्साही प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता मिरामार येथे झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.

- समीर नाईकपणजी  - रविवारी येथे आयोजित आयर्नमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेला उत्साही प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता मिरामार येथे झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. आयर्नमॅन ७०.३ चे आयोजक दीपक राज व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या रोमांचक स्पर्धेत निहाल बेग, टोनी स्नॉक्सेल यांनी आयर्नमॅन ७०.३ चा किताब पटकावला.

उद्घाटन समारंभावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात कठीण मानली जाणारी आयर्नमॅन ७०.३ ट्रायथालॉन स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून गोव्यात हाेत आहे, ही आमच्यासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि स्पर्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी सहभागासाठी एक वर्ष आधीपासून याची तयारी केली जाते. त्यामुळे या ट्रायथलॉनदरम्यान सहभागींची जिद्द,  चिकाटी पाहण्यासारखी असते. या स्पर्धेसाठी आमचा नेहमीच पाठिंबा असेल.’

आयोजक दीपक राज म्हणाले की, ‘राज्य सरकारचा नेहमीच आयर्नमॅन ७०.३ ला पाठिंबा लाभला आहे. त्यामुळे भविष्यात ही स्पर्धा येथेच आयोजित करण्याचा आमचा विचार आहे. येथे सहभागींचादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. आयर्नमॅनसाठी येथे चांगले वातावरण आहे.’

असा आहे निकाल : - स्पर्धेत आंध्र प्रदेशच्या निहाल बेगनेपुरूष गटात ०४:३२:०५ अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर मणिपूरच्या एल. बितेन सिंगने ०४:३९:२४ वेळेसह दुसरे आणि बिश्वरजित सायखोम याने ०४:४२:१३ वेळेसह तिसरे स्थान पटकावले. -  महिला गटात दक्षिण आफ्रिकेची टोनी स्नॉक्से हिने ०५:०९:१० अशी वेळ नोंदवत प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर ०५:१२:५० अशी वेळ नोंदवून झेक प्रजासत्ताकमधील तातियाना प्लायासुनोव्हा आणि कर्नाटकची टिमटीम शर्मा हिने ०५:२३:३३ अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त केला.- तसेच रीलेमध्ये टीम अरायास परफॉर्मन्स इंडिया, टी. टी. बी. पियोनीर आणि टी. टी. बी. एस. वॉरियर्स यांनी अनुक्रमे पहिला ते तिसरा क्रमांक प्राप्त केला.

टॅग्स :goaगोवा