शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेची माहिती न देणाऱ्या लोकप्रतिनिंधीविरोधात लोकायुक्त आक्रमक; अहवाल राज्यपालांकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:25 IST

लोकप्रतिनिधींची नावे सार्वजनिक करण्याची प्रक्रिया लोकायुक्तांकडून सुरू

पणजी : गोव्याचे लोकायुक्त पी. के. मिश्र यांनी मालमत्तेची माहिती न देणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. संपत्तीची माहिती न देणाऱ्या सरपंच, पंच, नगराध्यक्ष,नगरसेवक व जिल्हा पंचायत सदस्य यांच्याबद्दलचा अहवाल मिश्र यांनी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना सादर केला आहे. मालमत्तेचा तपशील न देणाऱ्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे सार्वजनिक करण्याची प्रक्रिया लोकायुक्तांनी सुरू केली आहे.लोकायुक्तांनी पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य यांना स्वत:ची मालमत्ता व कर्जे याविषयीची माहिती असलेला अहवाल सादर करण्यास दोन महिन्यांची मुदत दिली होती. सर्व पंच, नगरसेवक यांना पंचायती व पालिकांमार्फत लोकायुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी नोटीस पाठवली होती. त्यानंतर काहीजणांनी माहिती सादर केली. पण शेकडो पंच सदस्यांनी माहिती सादर केली नाही. पन्नासपैकी वीस जिल्हा पंचायत सदस्यांनीही माहिती सादर केली नाही. अनेक नगरसेवकांकडूनही त्यांच्या मालमत्तेची माहिती आली नाही. यामुळे लोकायुक्तांनी आता प्रत्येकाच्या नावासह अहवाल तयार केला व तो अहवाल राज्यपालांना पाठवला आहे. राज्यपालांनी गोवा विधानसभेकडे हा अहवाल पाठवून द्यावा व विधानसभेत हा अहवाल मांडला जावा, असे गोवा लोकायुक्त कायद्याला अपेक्षित आहे. त्यानुसार लोकायुक्तांनी पाऊले उचलली. काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी 2017 साली आपल्या मालमत्तेची माहिती दिली. पण 2016 साली दिली नाही. दरवर्षी माहिती देणे अपेक्षित असते. ज्यांनी 2016 साली माहिती दिली नाही, त्यांचीही नावे लोकायुक्तांनी अहवालात समाविष्ट केली आहेत. ही नावे प्रसिद्ध करण्यासाठी लोकायुक्त कार्यालयाने आपल्या अहवालाची प्रत सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याकडेही पाठवली आहेत. यामध्ये हजार नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

टॅग्स :goaगोवा