शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

'एक्झिट पोल'च्या अंदाजाने भाजपमध्ये खुशीचा माहोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2024 07:32 IST

काँग्रेसचे 'वेट अॅण्ड वॉच' आरजीकडूनही विजयाचा दावा.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला मिळतील, असे भाकीत करण्यात आल्याने भाजपमध्ये खुशीचा माहोल आहे तर दुसरीकडे काँग्रेस व आरजीही विजयाबाबत दावे करीत आहे. उत्तर गोव्यात भाजपने केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा एक लाखापेक्षा अधिक मतांनी तर दक्षिण गोव्यात पल्लवी धेपे यांचा २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय होईल, असा दावा केला आहे. एक्झिट पोलमधून बहुतांश चॅनेल्सनी दोन्ही जागा भाजपकडे जातील, असे म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी एक्झिट पोलचे अंदाज खोटे असल्याचे म्हटले असून गोव्यात दोन्ही जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा केला आहे. आजच्या निकालानंतर भाजप आणि मोदींची 'एक्झिट' होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

आरजीला ग्रामीण भागात मताधिक्क्य : मनोज परब

आरजीचे प्रमुख तथा उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार मनोज परब म्हणाले की, परप्रांतीय मोठ्या संख्येने असलेल्या शहरांमध्ये आरजीने जादा मतांची अपेक्षा ठेवलेली नाही. ग्रामीण भागातच आम्हाला जास्त मते मिळतील. ते म्हणाले की, भाजपने 'हिंदू खतरें में हैं' असा नारा लावत प्रचार केला. कॉंग्रेसने अल्पसंख्याक धोक्यात आहेत, असा प्रचार केला तर आरजीने गोवेकर धोक्यात आहेत, हे लोकांना पटवून दिले. लोक आमच्यासोबत आहेत.

दुपारपर्यंत चित्र स्पष्ट

नवा खासदार कोण? हे आज दुपारपर्यंत निकालांती स्पष्ट होणार आहे. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होईल. दुपारी १ वाजेपर्यंत विजयी उमेदवार घोषित होतील. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी जव्यत तयारी ठेवली आहे.

महाआघाडीचा परिणाम होणार नाही : तानावडे

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे  म्हणाले की, आता निकालांची केवळ औपचारिकता बाकी आहे. गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी केली. या निवडणुकीत गोव्यात ही महाआघाडी आमचे काही बिघडवू शकणार नाही. तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही आम्हाला रोखू शकणार नाही.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४