शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर? खंडपीठाचा सरकारला प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 20:24 IST

राज्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे काय असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला. सेरुला कोमुनिदादची कार्यकारणीची निवडणूक गोंधळ घातल्यामुळे स्थगित करावी लागली होती. हा मुद्दा मंगळवारी सुनावणीसाठी आला असता खंडपीठाने हा प्रश्न केला. 

पणजी: राज्यात कायदा सुव्यवस्था नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे काय असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला केला. सेरुला कोमुनिदादची कार्यकारणीची निवडणूक गोंधळ घातल्यामुळे स्थगित करावी लागली होती. हा मुद्दा मंगळवारी सुनावणीसाठी आला असता खंडपीठाने हा प्रश्न केला. 

सेरुला कोमुनिदादची निवडणूक प्रक्रिया पोलीस संरक्षणात घेण्याचा न्यायालयाचा आदेश होता. त्यानुसार २७ जानेवारी रोजी कोमुनिदाद प्रशासकाच्या आदेशानुसार निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोमुनिदादचे दोन सरळ गट पडले असल्यामुळे  आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे हा मुद्दा न्यायालयासमोर आला होता. २७ जानेवारी रोजी ५९ पोलिसांच्या बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिाय सुरू झाली तेव्हा कोमुनिदादच्या एका गटाने गोंधळ घालायला सुरूवात केली . त्यानंतर हा गोंधळ वाढून निवडणूक बंदच करावयास प्रशासकाला भाग पडले. या प्रकरणात अहवाल खंडपीठाने मागविला होता. 

अहवालातील नोंदी पाहून न्यायमूर्ती महेश सोनक व पृथ्विराज चौहान यांनी सरकारवर कडक ताशेरे ओढले. कोमुनिदादच्या निवडणुकाही शांततेत होवू शकत नाहीत. राज्यात कायदा  सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर गेली आहे काय? असा प्रश्न सरकारी वकिलांना केला. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी तातडीने उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी संध्याकाळी २.३० वाजता हजर राहाण्याचा आदेशही त्यांनी दिला. परंतु नंतर या आदेशात दुरुस्ती करताना अधिक्षकांना बुधवारी उपस्थित राहण्यास सांगितली. त्यामुळे उत्तर गोव्याच्या अधीक्षक चंदन चौधरी यांना बुधवारी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 

अतिरिक्त सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी खंडपीठाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, ‘एका कोमुनिदादची निवडणूक गोंधळामुळे स्थगिती ठेवावी लागली तर त्याला राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला असे म्हणता येणार नाही. तसेच कोमुनिदाग निवडणुकीसाठी  पोलिसांचा मोठा फौजफाटा देण्यासही मर्यादा पडतात. राज्यातील सर्व कोमुनिदाद ससमितींच्या निवडणुकीत असा पोलीस फौज फाटा पाठवावा काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Courtन्यायालय