लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह आठ आमदारांच्या अपात्रता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने सभापती रमेश तवडकर यांना काल, बुधवारी नोटीस जारी केली आहे.
सभापतींच्या निवाड्याला याचिकादार डॉमिनिक नोरोन्हा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अपात्रता प्रकरणात दिगंबर कामत यांच्यासह सर्व आठ आमदारांना पात्र घोषित करण्याच्या गोव्याचे सभापती तवडकर यांच्या निवाड्याला याचिकादार नोरोन्हा यांनी उच्च न्यायालयात केलेल्या आव्हान याचिकेला अनुसरून न्यायालयाने संबंधिताना नोटिसा जारी केल्या आहेत.
सभापतींसह आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, रुदोल्फ फर्नाडिस आणि राजेश फळदेसाई यांना नोटिसा जारी केल्या आहेत.