शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सारीपाट: प्रशासनाची घडी; आता हवी छडी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 10:00 IST

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जी कामे करायला हवीत ती कामे आमदार व मंत्र्यांना करावी लागतात.

- सद्‌गुरु पाटील

अनेक मंत्री, आमदारांकडे साध्या साध्या कामांसाठी लोक येतात. नळाचे कनेक्शन, वीज कनेक्शन मिळत नाही, साधे कसले तरी प्रमाणपत्र मिळत नाही, तलाठी पंचायतीत येतच नाही, सचिव उद्धट बोलतो, पोलिस निरीक्षक नीट बोलत नाही, सरकारी कर्मचारी फाईल मुव्ह करत नाहीत.. अशा तक्रारी घेऊन लोक मंत्र्यांना भेटतात. याचा अर्थ असा की- अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जी कामे करायला हवीत ती कामे आमदार व मंत्र्यांना करावी लागतात.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा हा दुसरा टर्म आहे सावंत यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार मार्च २०२२ मध्ये अधिकारावर आले. येत्या तीन महिन्यांत दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. मुख्यमंत्री सावंत यांचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. त्यांना प्रशासनाचा खूप अनुभव आलेला आहे. अशावेळी नोकरशाहीला अधिक सक्रिय करण्याचे काम मुख्यमंत्र्यांना पार पाडावे लागेल. प्रशासकीय स्तरावर अधिकाऱ्यांनी लोकांची अधिकाधिक कामे जलदगतीने करावीत म्हणूनमुख्यमंत्र्यांना अधिक लक्ष द्यावे लागेल, त्यासाठी थोड़ी कडक भूमिकाही घ्यावी लागेल, कारण काही सरकारी खाती अजून देखील सामान्य लोकांना केवळ खेपा मारायला भाग पाडतात. अनेक सेवा जरी ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात असल्या, तरी लोकांना अद्याप ऑनलाईन सेवा अंगवळणी पडलेली नाही. त्याचा सराव झालेला नाही. शिवाय ग्रामीण जनतेसमोर तांत्रिक समस्याही येतातच. मुख्यमंत्री सावंत अनेक तास काम करतात. ते प्रशासनाचा गाडा पुढे नेऊ पाहतात.

पूर्ण गोव्यात फिरून भाजपचे काम करतानाच मुख्यमंत्री सातत्याने लोकांच्याही संपर्कात असतात. विशेषतः विद्यार्थी, युवक, मुले यांच्याशी निगडीत कार्यक्रममुख्यमंत्री चुकवत नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढून घेणे लहान मुलांना खूपच आवडते आणि मुख्यमंत्रीही त्यासाठी वेळ देतात, मनोहर पर्रीकर हेदेखील मुलांमध्ये रमायचे, सावंतही रमतात. सरकारला दोन वर्षे होत आल्याने आता प्रशासनाची घड़ी अधिक व्यवस्थित व्हायला हवी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हाती छडी घेऊन काही अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे. काही अधिकारी किंवा मामलेदार आदी अधिकारी निलंबित झाल्याशिवाय जनतेची कामे फास्ट होणार नाहीत. कायदे व प्रक्रिया सुटसुटीत कराव्या लागतीलच,

कोमुनिदाद जमिनीतील गोमंतकीयांची घरे कायदेशीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर तरतूद करावीच मात्र पूर्वर्वीदेखील खासगी जमिनीतील घरे कायदेशीर करण्यासाठी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारने कायदा केला होता. तरीदेखील अनेक सरकारी अधिकारी अजून देखील लोकांचे त्यासाठीचे अर्ज लवकर निकालात काढत नाहीत. खासगी जागेतील किती घरे कायदेशीर झाली याचा आढावा जर मुख्यमंत्र्यांनी घेतला तर आकडेवारी कमी आहे, असे दिसून येईल.

मुख्यमंत्र्यांनी मुंडकारांना न्याय देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सावंत यांनी पाऊलेही उचलणे सुरू केले आहे. शनिवारीदेखील सुनावण्या घ्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी मामलेदार, उपजिल्हाधिकारी यांना केली आहे, ही चांगली गोष्ट, याचे स्वागत करावेच लागेल, मात्र एक वर्षानंतर मुख्यमंत्र्यांनी मामलेदार व डेप्युटी कलेक्टरांकडून आढावा घ्यावा, कामाचा प्रगती अहवाल घ्यावा, खरेच मुंडकारांना तिनशे चौरस मीटर जमिनीची मालकी मिळाली काय, मुंडकारांना घरे मिळाली काय याची उत्तरे मामलेदारांकडून घ्यावीत. काही अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. मात्र अनेकजण आळशासारखे वागतात. शिवाय निवडणूकविषयक, मतदार याद्यांशी निगडीत व अन्य कामांचे निमित्त सांगून मामलेदार व उपजिल्हाधिकारीही लोकांना न्याय देत नाहीत.

दर सोमवारी सर्व सरकारी कार्यालयांबाहेर लोकांची रांग असते. एका बाजूने मंत्री, आमदारांच्या कार्यालयांबाहेर रांगा व दुसऱ्या बाजूने सरकारी कार्यालयांबाहेर लोक बिचारे प्रतीक्षेत असतात, परवा मला भाजपच्याच कोअर टीमचा एक सदस्य सांगत होता- अहो, एका टेबलवरून सरकारी फाईल दुसन्या टेबलवर जाण्यासाठी एक महिना लागतो, कंटाळा येतो. कशी कधी प्रशासनाचा, महसूल, कृषी व अन्य काही खात्यांच्या मंत्र्यांना काही पडूनच गेलेले नाही, लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे काही मंत्री पाहतदेखील नाहीत.

सुपारी, काजू, भात पीक यासाठी सरकार आधारभूत किंमत जाहीर करते. मोठ्या बातम्या झळकतात पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. दुधावर अनुदान जाहीर केले जाते. प्रत्यक्षात सबसीडीची रक्कम लवकर मिळत नाही. दर पावसाळ्यात लोकांच्या पिकाचे, घरांचे नुकसान होते, पण लोकांना लवकरभरपाई मिळत नाही. मुख्यमंत्री एकटे खूप काम करतात, पण अन्य काही मंत्र्यांनाही सक्रिय व्हावे लागेल, तरी बरे मुख्यमंत्री सावंत यांनी बांधकाम खाते स्वत:कडे ठेवले आहे. ते आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे दिले नाही, हे चांगले केले. युवा-युवतींना गुणवत्तेच्या आधारे थोड्या तरी नोकऱ्या मिळायला हव्यात. मंत्र्यांचा अति हस्तक्षेप नोकर भरतीत होऊ लागला तर मग शिक्षित युवक नोकऱ्यांसाठी गोव्याबाहेरच स्थलांतर करत राहतील. अनेक मंत्री, आमदारांकडे साध्या साध्या कामांसाठी लोक येतात. नळाचे कनेक्शन, वीज कनेक्शन मिळत नाही, साधे कसले तरी प्रमाणपत्र मिळत नाही, तलाठी पंचायतीतयेतच नाही, सचिव उद्धट बोलतो, पोलिस निरीक्षक नीट बोलत नाही, सरकारी कर्मचारी फाईल मुव्ह करत नाहीत, अशा तक्रारी घेऊन लोक मंत्र्यांना भेटतात. याचा अर्थ असा की- अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जी कामे करायला हवीत ती कामे आमदार व मंत्र्यांना करावी लागतात. 

प्रशासनाच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांनी छडीचे वळ काढण्याची वेळ आलेली आहे. एकाच पंचायत सचिवाकडे किंवा तलाठ्याकडे तीन-चार ठिकाणच्या कामाचे चार्ज देणेही बंद व्हायला हवे. काही पालिकांचे मुख्याधिकारीही तीन-चार ठिकाणी धावपळ करतात व मग ते कुठच्याच कामाला योग्यप्रकारे न्याय देऊ शकतनाहीत. मुख्यमंत्री दर शनिवारी-रविवारी साखळी रवींद्र भवनात लोकांना भेटतात. मुख्यमंत्र्यांचा लोकसंपर्क मोठा आहे. अनेक युवा-युवती अन्य लोक अपेक्षेने मुख्यमंत्र्यांकडे येतात. कुळ-मुंडकारदेखील येतात. मुंडकारांचा प्रश्न जर मुख्यमंत्री सोडवू शकले तर खरोखर इतिहासात प्रमोद सावंत यांचे नाव कायम राहील.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार