शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोवा ते आंबोली घाट चित्तथरारक प्रवास, मोरजी किनाऱ्यासाठी गोव्याला पुरस्कार

By किशोर कुबल | Updated: December 10, 2023 14:55 IST

Goa News: पर्यटन क्षेत्रात चमकणाय्रा गोवा राज्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत चित्तथरारक प्रवासासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराज्य ‘रोड ट्रिप रूट्स’ तसेच सर्वोत्तम ‘बीच डेस्टिनेशन’चे आउटलुक ट्रॅव्हलर अवॉर्ड्स पटकावले आहेत.

- किशोर कुबल पणजी - पर्यटन क्षेत्रात चमकणाय्रा गोवा राज्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत चित्तथरारक प्रवासासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराज्य ‘रोड ट्रिप रूट्स’ तसेच सर्वोत्तम ‘बीच डेस्टिनेशन’चे आउटलुक ट्रॅव्हलर अवॉर्ड्स पटकावले आहेत.

गोवा ते शेजारी महाराष्ट्रातील आंबोली घाट (सिंधुदुर्ग) या चित्तथरारक प्रवासासाठी गोव्याला सर्वोत्कृष्ट आंतरराज्य ‘रोड ट्रिप रूट्स’चा पुरस्कार मिळाला आहे तर प्रसिध्द मोरजी किनाय्राने देशातील सर्वोत्तम ‘बीच डेस्टिनेशन’चा किताब मिळवला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्यटन खाते अभिनंदन करताना गोवा पर्यटनाच चमकतच राहील, असे म्हटले आहे. पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांच्या प्रयत्नांनी हे यश मळाले आहे असे नमूद करुन त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

आउटलुक रिस्पॉन्सिबल टुरिझमच्या प्रकल्प व्यवस्थापिक नबिहा तस्नीम यांच्या नेतृत्वाखाली "गोवा बियॉन्ड बीचेस" या विषयावरील चर्चासत्राच्यावेळी एका भव्य कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पुरस्कार स्विकारला. खंवटे यांनी गोव्यात किनाय्रांव्यतिरिक्तही अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत अशी नमूद करुन पर्यटनाच्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली. गोवा समृद्ध संस्कृती आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा खजिना आहे.

पर्यटन मंत्र्यांनी गोव्यातील गावांचे सौंदर्य शोधण्याच्या महत्त्वावर भर दिला तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. खंवटे म्हणाले की, ‘हे पुरस्कार भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी गोव्याची कटिबद्धता दर्शवितो.’

टॅग्स :goaगोवा