शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

२0१५ पर्यंत गोवा कचरामुक्त !

By admin | Updated: August 18, 2014 01:20 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा : किनारे, नद्याही स्वच्छ होणार

सावर्डे : सरकार पुढील डिसेंबर २0१५ पर्यंत गोवा कचरामुक्त करणार आहे. संपूर्ण राज्यातील सर्व समुद्रकिनारे, नद्या व इतर भागांत कचरा दिसणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली. कुडचडे मतदारसंघातील काडा सभागृहात झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, आमदार नीलेश काब्राल, आमदार सुभाष फळदेसाई, आमदार गणेश गावकर, कुडचडेच्या नगराध्यक्ष कार्मेलिना फर्नांडिस, उपनगराध्यक्ष प्रदीप नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. कुडचडे येथील या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पर्रीकर म्हणाले की, लोक घरातील कचरा पुलावरून पाण्यात टाकतात. आता तर पूल हे आत्महत्येचे केंद्र झालेले असल्याने पुलावर जाळ्या बसविण्याचा विचार करावा लागणार आहे. माणसाला अशा प्रकारचे विचार मनात का येतात, यावरही गंभीरपणे विचार करण्यात येईल. त्यासाठी समाजात चांगले ज्ञान देऊन अशा निर्णयापासून त्यांना परावृत्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपणास भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांमुळे विजय प्राप्त झाल्याचे अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. गोव्याचे जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आपण संसदेत सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहे, त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे, असेही ते म्हणाले. काब्राल म्हणाले की, कोणत्याही कारणावरून खाण व्यवसाय जरी दोन वर्षांमागे बंद पडलेला असला तरी आता कायदेशीर व अधिकृत खाणी लवकरच चालू होणार आहेत. पर्रीकर यांनी गेल्या अडीच वर्षांच्या राजवटीत आम्हाला लोकांसमोर जाण्याचा धीर दिला. विविध योजनांद्वारे लोकांना दिलासा दिलेला असून, गृहआधार योजनेत वाढ करून १२00 रुपये केल्याचे त्यांनी सांगितले. कुडचडेतील काँग्रेसच्या ३४ समितींतील २0 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने यापुढे येथे पक्ष बळकट झाल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी खासदार सावईकर यांचा सत्कार करण्यात आला. आशिष करमली यांनी सूत्रसंचालन केले. अशोक नाईक यांनी आभार मानले. (लोे. प्र.)