शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मासेमारी बंद पण रस्त्यांवर मासे विक्री सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 17:09 IST

मासेमारी जाहीर केली असली तरी मडगावात कित्येक ठिकाणी रस्त्यावर माश्यांची विक्री चालूच होती. 200 रुपयांना चार बांगडे या दरात ही मासेविक्री चालू होती.

मडगाव - सरकारने राज्यात संपूर्ण मासेमारी जाहीर केली असली तरी मडगावात कित्येक ठिकाणी रस्त्यावर माश्यांची विक्री चालूच होती. 200 रुपयांना चार बांगडे या दरात ही मासेविक्री चालू होती. कुटबण येथे मासेमारी बोटी तडीवर आणून ठेवल्या असल्या तरी कित्येक मासे विकणारे एजंट आपल्या माणसांमार्फत  रस्त्यावर मासेविक्री करत असून मडगावचे मुख्य मासळी मार्केट जरी बंद असले तरी पाजीफोंड, दवरली, सिने लता परिसर, रावणफोंड या भागात दुचाकीवर माशाच्या पाट्या लावून मासेविक्री चालू होती.

कुंकळी, असोळणा या भागातही रस्त्यावर बसणाऱ्या मासे विक्रेत्याकडे बांगडे व सुंगटे उपलब्ध होती. एसजीपीडीएचे अध्यक्ष असलेले बाबशान डीसा यांच्या नुवे मतदारसंघातही लोकांना मासे मिळाले. या बद्दल विचारले असता माहिती मिळाली की मासेविक्री करणाऱ्या एजंटानी आपल्या डीप फ्रिजमध्ये ठेवलेले मासे आता बाहेर काढले आहेत. काही दिवसापूर्वी मासे घेऊन आलेल्या बोटींच्या मालकांना पकडलेले मासे फॅक्टरीत विकण्याचा आदेश दिला होता आता तेच मासे बाहेर येत असल्याचा आरोप काही जणांनी केला .

अंडी अव्वाच्या सव्वा दारात

अंड्यांच्या आयातीवर बंदी घालण्याच्या चार दिवसांपूर्वी काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अंडी विकत घेतली होती. 40 रुपये किलो या दराने विकत घेतलेली ही अंडी काही व्यापाऱ्यांनी 60 ते 80 रुपये या दराने लोकांना विकली.

मडगावचे माजी नगराध्यक्ष सवियो कुटीन्हो यांनी हा प्रकार म्हणजे संचारबंदीच्या काळात केलेला काळा बाजार असा आरोप केला. चार दिवसानंतर बंदी येणार याची माहिती उद्योजकांना असल्यामुळे त्यांनी कमी किमतीत ती इतर विक्रेत्यांना विकून आपला स्टॉक संपविला तर काही जणांनी तीच अंडी बाजारात आणून डबल भावाने विकतानाच आपल्यामुळेच लोकांना अंडी मिळाली असा भावही खाल्ला असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाFishermanमच्छीमार