शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
6
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
7
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
8
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
9
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
10
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
12
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
13
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
14
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
15
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
16
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
17
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
18
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
19
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
20
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा

भारत-पोर्तुगीजच्या कला संस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘सेमान दा कुल्तुरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:38 IST

पणजी : भारत-पोर्तुगीज या दोन्ही राष्ट्रांच्या समृद्ध कला सांस्कृतिक व खाद्यपदार्थांचा उत्सव साजरा करण्यासाठी दर वर्षी ‘सेमान दा कुल्तुरा इंडो-पोर्तुगीज ( गोवा )’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचे हे दहावे वर्ष असून गोवा -पोर्तुगीजच्या पारंपरिक संस्कृ तीवर प्रकाश पाडणा-या या महोत्सवात कला, चित्रपट, संगीत, पाककृती, साहित्यांचा समावेश असेल. तसेच ...

पणजी : भारत-पोर्तुगीज या दोन्ही राष्ट्रांच्या समृद्ध कला सांस्कृतिक व खाद्यपदार्थांचा उत्सव साजरा करण्यासाठी दर वर्षी ‘सेमान दा कुल्तुरा इंडो-पोर्तुगीज (गोवा)’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचे हे दहावे वर्ष असून गोवा-पोर्तुगीजच्या पारंपरिक संस्कृ तीवर प्रकाश पाडणा-या या महोत्सवात कला, चित्रपट, संगीत, पाककृती, साहित्यांचा समावेश असेल. तसेच चित्रपट महोत्सव, संगीत कार्यक्रम व कार्यशाळा, छायाचित्र प्रदर्शनाचे कार्यक्रम होतील, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष फ्रान्सिस्को मार्टिन्स यांनी दिली. गोवा व पोर्तुगीजच्या सहयोगाने राज्यात २९ सप्टेंबरपासून हा महोत्सव होत आहे.

गोव्याची अनन्य ओळख राखण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. गोवा आणि पोर्तुगीज यांच्यात सामाजिक-आर्थिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने हा उत्सव होतो. येत्या आठवड्याच्या अखेरीस या उत्सवाला सुरुवात होईल. यासंबंधी माहिती देण्यासाठी पणजीत सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. याला संयुक्त सचिव फ्रान्सिस्को नोरोन्हा, माजी अध्यक्षा आॅर्टी सोरेस व मारीया इनेस फिगेरा उपस्थित होत्या. फ्रान्सिस्को मार्टीन्स म्हणाले, भारत व पोर्तुगीज या देशांचा संस्कृती वारसा मोठा आहे. भारतात विविध संस्कृतींचे मिश्रण असून प्रत्येक गोष्टीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. गोव्याचीही वेगळी सांस्कृतिक ओळख असून ती भारतीय आणि पाश्चात्य नृत्यांत मोडते. या महोत्सवातून लोकांना दोन्ही देशांच्या विविधतेचा आनंद लुटता येईल. 

महोत्सवाची सुरुवात दि. २९ सप्टेंबरला हॉटेल मांडवीमध्ये होणा-या कार्यक्रमापासून होईल. याचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते होईल. या वेळी ‘गोव्याच्या संस्कृतीवर पोर्तुगीज प्रभाव’ या विषयावर चर्चासत्र होईल. यात लेखक अलेक्झांडर बार्बोसा, इतिहासकार प्रजल साखरदांडे व मारीया लुडर््स ब्रावो डिकॉस्ता हे सदस्य भाग घेतील. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरपर्यंत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस चालणारी ‘पाककला आणि सांगीतिक महोत्सव’ होय. ज्यात गोवा-पोर्तुगीजची खाद्यसंस्कृतीची मिष्टान्न असेल. २९ व ३० नोव्हेंबरला ताळगाव कॉम्युनिटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल. गोव्यातील संगीतकारांची मैफलही होईल. 

भारत-पोर्तुगीज हा महोत्सवअंतर्गत येत्या ५ डिसेंबरला फॅडो गायन स्पर्धा होईल. ही स्पर्धा इस्टिट्यूट ब्रांगाझाच्या सभागृहात होईल. शिवाय गायिका सोनीया शिरसाट व प्रो. डेल्फिम कोरिया डिसिल्वा हे खास कार्यशाळा घेतील. त्याचबरोबर इस्टिस्ट्यूट ब्रांगाझाच्या सभागृहात छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येईल.  यात पॅटेलिओ फर्नांडिस यांच्या रेअर पोर्टेट्स’ या पुस्तकातील काहींचे छायाचित्र प्रदर्शनही भरविले जाईल.  हे प्रदर्शन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान चालेल.  पोर्तुगीज चित्रपट महोत्सव दि. ८, ९ व १० डिसेंबरला मॅकेनिझ पॅलेसमध्ये आयोजिला आहे. यात नलीनी एल्विनो डिसोझा व प्रा. डेल्फीम कोरिया डिसिल्वा यांनी निवडलेले इंडो-पोर्तुगीज चित्रपटांचा समावेश असेल.  

टॅग्स :goaगोवा