शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात किनारा सफाई घोटाळ्यातील कंत्राटदारांना पैसे न फेडण्याचा आदेश कायम

By admin | Updated: July 19, 2016 18:27 IST

गोव्यात गाजत असलेल्या किनारा सफाई घोटाळा प्रकरणात कंत्राटदारांना पैसे न फेडण्याचा आदेश कायम ठेवताना लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी या प्रकरणी पुढील सुनावणी

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 19 -  गोव्यात गाजत असलेल्या किनारा सफाई घोटाळा प्रकरणात कंत्राटदारांना पैसे न फेडण्याचा आदेश कायम ठेवताना लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी या प्रकरणी पुढील सुनावणी २ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कथित घोटाळ्यात कंत्राटदारांना या पुढे पैसे फे डू नये, असा आदेश ६ जुलै रोजी लोकायुक्तांनी दिला होता. पर्यटन संचालक संजीव गांवस देसाई यांनी मंगळवारी हा आदेश मागे घेतला जावा, अशी मागणी करणारा अर्ज सादर केला. तक्रारदार आयरिश रॉड्रिग्स यांनी यास विरोध करताना उलट दोन्ही कंत्राटदारांकडून आतापर्यंत त्यांना पोच झालेले पैसे वसूल केले जावेत, अशी मागणी केली. या कंत्राटदारांनी किनारा सफाईचे काम न करता सरकारी तिजोरी रिकामी केली आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या अहवालात किनारा सफाईच्या कामातील त्रुटींवर बोट ठेवून खरमरीत अहवाल सरकारला सादर केला होता. आयरिश यांनी या अहवालाचा हवाला देताना कंत्राटदार किनाऱ्यांची सफाई योग्य प्रकारे करण्यास असमर्थ ठरले असल्याचा दावा केला. कंत्राटदार राम इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन्स व भुमिका क्लीन टॅक कंपनीचे मनिष मोहाता यांनी लोकायुक्तांसमोर उपस्थिती लावून उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली. या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना आयरिश यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, राम इंजिनीयरिंग आणि भूमिका क्लीन टेक या दोन्ही कंपन्यांचे मालक मनिष मोहाता, पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे बंधू अवधूत यांच्याविरुध्द भादंसंच्या कलम ४२0, १२0 (ब), १९८८च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ८, ९, १३ (१) (ड) १३ (२) सह गुन्हे नोंदविण्याची मागणी केली आहे. सप्टेंबर २0१४ साली हे कंत्राट देण्यात आले. उत्तर गोव्यातील किनाऱ्यांच्या साफसफाईचे वार्षिक ७ कोटी ५१ लाख ४0 हजार ९९९ रुपये कामाचे कंत्राट भूमिका क्लीन टेक कंपनीला तर दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांच्या साफसफाईचे काम राम इंजिनियरिंग या कंपनीला ७ कोटी ४ लाख ८७ हजार ९९९ रुपयांना दिले होते. दोन्ही कंपन्यांचे मालक मनिष मोहता हेच आहेत, असाही आयरिश यांचा दावा आहे. एरव्ही २ कोटी रुपयांमध्ये होणाऱ्या कामासाठी १४ कोटी ५६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.