ऑनलाइन टीमपणजी, दि. २२ - गोव्यातील तीन मंत्री आणि चार आमदार यांच्या परदेशागमानाचा खर्च तब्बल ६ कोटी रुपये इतका आहे. तसेच हे पैसे सामान्य करदात्यांच्या खिशातून गेले असल्याचा तपशील समोर आला आहे. गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी सर्वाधिक पैसे खर्च केले असल्याचे सांगण्यात येत आहे. परुळेकर यांनी २६ व्यापार दौरे हे राज्य सरकारच्या खर्चाने केले आहेत. विदेशातील दौ-यांबाबत परुळेकर यांच्यानंतर ऊर्जा मंत्री मिलिंद नाईक व उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी देखील खर्चाची सीमा ओलांडली आहे. आपल्या परदेश दौ-यांचे समर्थन करत, परुळेकर यांनी सांगितले की, दौरे हे गोव्याच्या पर्यटनाचा विकास होण्याकरता केले होते. या प्रकरणी काँग्रेस नेते दुर्गादास कामत यांनी गोव्याच्या मुख्य मंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. ' गोवा हे फार पूर्वीपासून जगाच्या नकाशावर आहे. एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याकरता जगाचा प्रवास करण्याची गरज नाही. असं त्यांनी सांगितले. सहा नेत्यांच्या ब्राझील दौ-याचा खर्च ८९ लाख रुपये झाला असल्याचेही प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
गोव्याच्या मंत्र्यांची परदेशवारी कोटीच्या घरात
By admin | Updated: July 22, 2014 20:39 IST