शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: गोव्याच्या आमदारांच्या भत्ते आणि पेन्शनमध्ये घसघशीत वाढ, मंत्रिमंडळाची मंजुरी

By किशोर कुबल | Updated: August 9, 2023 23:39 IST

Goa: मंत्रिमंडळाने बुधवारी  बैठकीत आमदारांचे भत्ते आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती आणली जाईल. रात्री उशिरा सुत्रांनी ही माहिती दिली.

- किशोर कुबलपणजी - मंत्रिमंडळाने बुधवारी  बैठकीत आमदारांचे भत्ते आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती आणली जाईल. रात्री उशिरा सुत्रांनी ही माहिती दिली. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून मुख्यमंत्र्यांनी त्यातून वेळ काढत सायंकाळी उशिरा मंत्रिमंडळाची बैठक घेतली व तींत काही महत्त्वाचे निर्णय झाले.

आमदाराला आता आमदारकीच्या कार्यकाळाच्या जेष्ठतेनुसार ७५ हजार रुपयां ऐवजी कमाल २ लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकेल. चालू विधानसभा अधिवेशनातच ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी वेतनवाढीचे मागणी केली होती. प्रस्तावित वेतनवाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल १९ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

अधिवेशन काळात दिवशी भत्ता ३००० रुपयांवरून ४००० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. कार खरेदीसाठी कर्ज मर्यादा १५ लाखांवरून ४० लाख रुपये, पेन्शन दरमहा ३०,००० रुपये व त्यात वार्षिक वाढ ४००० रुपये, पेट्रोल किंवा डिझेल दरमहा ३०० लिटरवरून ५०० लिटर,घर खरेदीसाठी कर्ज मर्यादा ३० लाखांवरून ४५ लाख रुपये करण्यात येणार आहे.याशिवाय आमदार स्वतःसाठी पाच कर्मचाऱ्यांऐवजी आता सात कर्मचारी दिमतीला घेऊ शकतील.सभापतींसाठी वैद्यकीय भत्ता ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येईल.

आमदारांसाठी महिना ३०० लिटर इंधनाऐवजी ६०० लिटर दिले जावे तसेच कार खरेदीसाठी सध्याची कर्ज मर्यादा १५ लाख रुपये आहे ती अपुरी पडत असल्याने किमान ३० लाख रुपये करावे, अशी मागणी कामत यांनी केली होती. ते म्हणाले होते की, इनोवा मोटार खरेदी केली तरी त्याची किंमत ३० लाख रुपये होते. त्यामुळे सरकारने या गोष्टीवर गंभीरपणे विचार करायला हवा. या अनुषंगाने काल मंत्रिमंडळ बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार