शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील हिंसाचाराचे गोवा विधानसभेत पडसाद

By admin | Updated: July 29, 2016 17:33 IST

म्हादईच्या प्रश्नावर लवादाने दिलेल्या अंतरिम निवाड्यानंतर कर्नाटकात जो हिंसाचार उसळलेला आहे. तेथील गोमंतकीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २९ : म्हादईच्या प्रश्नावर लवादाने दिलेल्या अंतरिम निवाड्यानंतर कर्नाटकात जो हिंसाचार उसळलेला आहे. तेथील गोमंतकीयांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांना येथून संदेश गेलेला आहे. दंडुकेशाही, दादागिरी, तोडफोड या गोष्टींना लोकशाहीत थारा नाही याची जाणीव तेथील राज्यकर्ते ठेवणार आणि कलह निर्माण करणार नाही अशी अपेक्षा आहे, असे निवेदन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत केले.

आमदार रोहन खंवटे यांनी कर्नाटकातील गोवेकरांमध्ये तसेव कामा-धंद्यानिमित्त बेळगांव, धारवाडला जाणाऱ्या गोवेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. गोव्यातील लोक तेथे असुरक्षित आहेत याकडे त्यानी लक्ष वेधले व याबाबतीत सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री यावर उत्तर देताना म्हणाले की, कर्नाटक गोव्याचा मोठा भाऊ आहे. एकमेकांकडे आम्ही दुष्मन म्हणून पाहू शकत नाही. हिंसाचाराचे प्रकार अज्ञानातून घडत आहेत. गोवा सरकारने कर्नाटककडे जाणाऱ्या आंतरराज्य बसगाड्या घाबरुन नव्हे तर तर खबरदारी म्हणून दोन तीन दिवस बंद ठेवलेल्या आहेत. गोमंतकीय कर्नाटकात आहेत तसेच कर्नाटकचे लोकही येथे आहेत. कर्नाटकचे लोक येथे सुरक्षित आहेत. गोवेकरांना कर्नाटकात कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांनी घाबरुनही जाऊ नये.