पणजी : फ्रान्समध्ये पॅरीसमधील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मिरामार, पणजी व काही महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत. गोवा पोलीस खात्याचे सशस्त्र जवान राज्यात काही ठिकाणी तैनात केले आहेत. पर्यटकांची गजबज असलेल्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यात पणजीतील मिरामार समुद्रकिनारा आणि सांता मोनिका जेटीजवळ तसेच कळंगुट, बागा व इतर ठिकाणीही सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत. पोलीस मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली. पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे साध्या केवळ साधा अलर्ट जारी केला आहे. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडून ओळखपत्रे घेतल्याशिवाय त्यांना राहायला न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू, हालचाली वगैरे दिसल्यास पोलीस नियंत्रण कक्षात म्हणजे १०० क्रमांकवर अशी माहिती तातडीने द्यावी, असे आवाहन केले आहे.
गोव्यात अलर्ट
By admin | Updated: November 15, 2015 01:43 IST