शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Goa: म्हापशात अतिक्रमणावर कारवाई

By काशिराम म्हांबरे | Updated: May 11, 2023 15:45 IST

Goa: म्हापसा शहरात खाद्य पदार्थासाठी प्रसिद्ध असलेल्या अलंकार थेटराजवळील गाडेधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर तसेच शहरातील इतर भागातील अतिक्रमणावर नगरपालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली.

- काशीराम म्हांबरे म्हापसा शहरात खाद्य पदार्थासाठी प्रसिद्ध असलेल्या अलंकार थेटराजवळील गाडेधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर तसेच शहरातील इतर भागातील अतिक्रमणावर नगरपालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली.  गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय संरक्षण मंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचे हे अत्यंत आवडीचेअसे ठिकाण होते.

उत्तर गोवा जिल्हाधिकाºयाने जारी केलेल्या अधिसुचनेच्या पार्श्वभुमीवर म्हापसा नगरपालिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदेशीर  विक्रेत्यांवर, होर्डिंग्जवर शहरात धडक कारवाई केली. धडक मोहिमेतून फुटपाथ तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाºयांवर ही कारवाई केली. बुधवार पासून सुरु झालेली ही मोहिम गुरुवारी सुद्धा सुरुच होती.

शहरातील या अतिक्रमणामुळे  पादचाºयांना वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांकडून या संबंधीच्या तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या. यात अलंकार थेटरजवळील परिसराचा सुद्धा समावेश होता. ही मोहिम मुख्याधिकारी आमीतेश शिरवईकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके निरीक्षक तसेच नगरपालसिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या या मोहिमेत ५ ट्रकाहून जास्त सामान जप्त करण्यात आले. आज गुरुवारी सुद्धा सामान जप्त करण्यात आले. मोहिमेसाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिरवईकर म्हणाले. प्रत्येक पथकात दोन निरीक्षक तसेच १० कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. मोहिम सुरु करण्यापूर्वी त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या. याच मोहिमेचा एक भाग म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या म्हापशातील बाजारातही मोहिम हाती घेतली जाणार आहे

टॅग्स :goaगोवा