शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कामाक्षी फोरेक्स प्रकरण सीबीआयकडे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 16:40 IST

कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचे कामाक्षी फोरेक्स प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने राज्य सरकारला दिला

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 24 - कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीचे कामाक्षी फोरेक्स प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. 
सहाशेहून अधिक लोकांची 5 कोटीहून अधिक रुपयांना फसवणूक केलेलेल्या कामाक्षी फोरेक्स प्रकरणात खंडपीठाने सोमवारी अंतीम निवाडा सुनावला. राज्य पोलीसांच्या तपास पद्धतीवर नाखूश होऊन न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी सोपस्कार सुरू करण्यास सांगितले आहेत. 
या प्रकरणात फसवणूक झालेल्यांपैकी नऊ जणांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. पोलिसांच्या अार्थिक गुन्हा विभागाकडून या प्रकरणात योग्य पद्धतीने आणि योग्य गतीने तपास होत नाही, असा दावा याचिकादारांच्या वकिलाकडून करण्यात आला होता. प्रत्येक फसवणुकीच्या प्रकरणात एक तक्रार या पद्धतीने सुमारे 600 तक्रारी आणि तितकेच गुन्हे नोंदविण्यात यावेत असा दावा केला होता. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन ते सीबीआयकडे सोपविण्यात यावे असेही याचिकेत म्हटले होते. 
या प्रकरणात अनेक सुनावण्या झाल्या होत्या. सुनावणी दरम्यान सरकारी अतिरिक्त वकिल प्रवीण फळदेसाई यांनी युक्तीवाद करताना तूर्त 9 याचिकादारांच्या मिळून 9 तक्रारींवर  9 गुन्हे आणि राज्यातर्फे एक असे एकूण दहा गुन्हे नोंदविण्यात यावेत खंडपीठाला सांगितले होते. न्यायालयाने हा युक्तीवाद विचारात घेताना तसा आदेशही दिला होता आणि या आदेशाची अंमलबजावणीही करण्यात आली होती. 
पोलिसांचा तपास समाधानकारक नसल्याचा दावा करून याचिकाकर्त्याच्या वकिलाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. सोमवारी झालेलया निवाड्यात न्या. एफ एम रेईश आणि नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने हे प्रकरण सीबीआयकडे देणयात यावे असा आदेश राज्य सरकारला दिला आहे. 
दरम्यान, या प्रकरणात तपास करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्य बळ आणि इतर साधन सुविधा सीबीआयकडे नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणातील  तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारतर्फे आवश्यक मनुष्य बळ आणि साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असेही आदेशात म्हटले आहे.