शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

खाद्य उद्योगासाठीचे ७५ लाख संजीवनीला देणार

By admin | Updated: February 19, 2015 02:24 IST

पणजी : संजीवनी कारखान्याला दर वर्षी सहा कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागते त्यामुळे संजीवनीला नवसंजीवनी देण्याची गरज आहे.

पणजी : संजीवनी कारखान्याला दर वर्षी सहा कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागते त्यामुळे संजीवनीला नवसंजीवनी देण्याची गरज आहे. खाद्य उद्योगासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून ७५ लाख रुपये संजीवनीसाठी वापरण्यात यावा, असा विचार उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी व्यक्त केला. सहकार खात्यातर्फे बुधवारी तेथे आयोजित ‘गोवा राज्य सहकारी पुरस्कार २०११-१२ व २०१२-१३’ या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. या वेळी व्यासपीठावर लोकसभा संसद सदस्य नरेंद्र सावईकर, सहकार खात्याचे सचिव फैजी ओ हश्मी, उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक, सुभाष फळदेसाई, संचालक नारायण सावंत उपस्थित होते. नाईक म्हणाले की संजीवनी मिनरल वॉटर प्रकल्प सुरू केल्यास संजीवनी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिकदृष्ट्या साहाय्य मिळेल. फोंडा येथील सहकार भवनाच्या उद्घाटनानंतर त्याठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम केले जाईल. सहकारी क्षेत्रात तरुणांनी पुढाकार घ्यावा यासाठी सिस्टममध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. या वेळी भास्कर नायक म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून प्रगती शक्य आहे. शेजारील राज्यातील सहकारी संस्था पाहता गोव्यातील संस्था फार उत्तम आहे. सहकार माध्यमातून एकत्र येऊन साळावली धरणाचे पाणी संजीवनीसाठी वापरता येईल काय यावर विचार होणे आवश्यक आहे. या वेळी रामकृष्ण डांगी यांना सहकार भूषण पुरस्कार देण्यात आला. रोहिदास नाईक यांना २०११-२०१२ चा शंकर श्री पुरस्कार देण्यात आला. २०११-१२ वर्षातील उत्कृष्ट संस्थेसाठी कुर्डी येथील वी.के.के.एस. सोसायटीला पुरस्कार देण्यात आला. डिचोली येथील दीनदयाळ नागरी सहकारी पथ संस्था मर्यादित व फोंडा येथील जी. व्ही. एम. स्टाफ को-ैआॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांना उत्कृष्ट संस्थेचा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. वर्षा मराठे, श्रीपाद ताम्हणकर यांना २०११-१२चा वैयक्तिक साहाय्यक पुरस्कार देण्यात आला. २०१२-१३ चा गोवा सहकार रत्न पुरस्कार मिलिंद केरकर यांना देण्यात आला, तर गोवा सहकार भूषण हा पुरस्कार प्रकाश शंकर वेळीप यांना देण्यात आला. २०१२-१३ चा सहकार श्री पुरस्कार किसन फडते, तुळशिदास मळकर्णेकर यांना देण्यात आला. आरोय सेवा संचालनालय सर्व्हिस अ‍ॅप्लोयी क्रेडिट सोसायटी लिमिटेड व धारबांदोडा वी.के.एस. सोसायटी लिमिटेड यांना २०१२-१३ चा उत्कृष्ट संस्थेचा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. रामकृष्ण गावकर यांना वैयक्तिक साहाय्यक व सुमन भोसले यांना ‘असिस्टंट टू इंडिविजल’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)