शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

बारावीत मुलींचीच बाजी

By admin | Updated: May 12, 2014 01:24 IST

बारावीत मुलींचीच बाजी

पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८५.५४ टक्के लागल्याचे रविवारी मंडळाने जाहीर केले. या परीक्षेत मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने उत्तीर्ण झाल्या. राज्यातील ८५ पैकी एकूण दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचे निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागले. शालांत मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी सचिव भगिरथ शेट्ये यांच्या उपस्थितीत रविवारी पर्र्वरीत पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर निकाल जाहीर केला. २०१२ साली बारावीच्या परीक्षेचा निकाल ८३.३६ टक्के लागला होता. २०१३ साली हे प्रमाण ८२.९६ टक्के झाले. यंदा एकूण निकाल ८५.५४ टक्के लागला. परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त होती; पण मुली जास्त संख्येने उत्तीर्ण झाल्या. एकूण ११ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते व त्यापैकी १० हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ८८.५५ टक्के मुली आणि ८२.५५ टक्के मुलांचा समावेश आहे. सर्व पद्धती अधिक सुटसुटीत करण्यात आल्याने यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल जास्त लागला, असे शालांत मंडळाचे अध्यक्ष रिबेलो म्हणाले. गेल्यावर्षी राज्यातील नऊ हायरसेकंडरींचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागला होता. यंदा अशा विद्यालयांची संख्या दहा झाली. झेवियर हायरसेकंडरी, पीपल्स हायरसेकंडरी, हरमल पंचक्रोशी, डॉन बॉस्को तसेच नव्याने सुरू झालेली धेंपे विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, वास्कोतील सेंट अ‍ॅण्ड्र्यूज या सहा हायरसेकंडरींचे निकाल आता प्रथमच ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागले आहेत. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फक्त १६७ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा आधार घ्यावा लागला. एका किंवा दोन विषयांमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांना येत्या १७ जून रोजी पुरवणी परीक्षा देता येईल, असे रिबेलो यांनी सांगितले. विशेष मुलांसाठीच हायरसेकंडरी चालविणार्‍या सेंट झेवियरचा निकाल ७० टक्के लागला. सरकारी हायरसेकंडरींचा निकाल हा अनुदानित विद्यालयांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात लागलेला नाही, असे रिबेलो यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून शालांत मंडळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करत नाही. (खास प्रतिनिधी)