शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीसीईटी निकाल जाहीर

By admin | Updated: May 12, 2015 01:58 IST

पणजी : गोवा सीईटीचा निकाल जाहीर झाला असून मुष्टिफं ड आर्यन हायर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

पणजी : गोवा सीईटीचा निकाल जाहीर झाला असून मुष्टिफं ड आर्यन हायर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. फिजिक्समध्ये मुष्टिफंड आर्यनचा आनंद पी. एस. (७0 गुण), केमिस्ट्रीमध्ये राही शेट्ये (६९) गुण मिळवून प्रथम स्थानी आली. राही हिने गोवा बोर्डातही बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत पहिला क्रमांक मिळविला आहे. मॅथेमॅटिक्समध्ये रोहन सक्सेना याने पैकीच्या पैकी ७५ गुण प्राप्त केले, तर बायोलॉजीमध्ये मुष्टिफंड हायर सेकंडरीची युगा गिरीश प्रभू हिने ६७ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला.शिक्षण सचिव पी. मॅथ्यू सॅम्युअल यांनी पर्वरी येथे तांत्रिकी शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात हा निकाल जाहीर केला. या प्रसंगी आयआयटी मुंबईचे प्रा. एस.एस. मेजर, तांत्रिकी शिक्षण संचालक विवेक कामत, उपसंचालक प्रदीप कुस्नूर, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन. शेट, सहाय्यक संचालक दीपक गायतोंडे, उल्हास सावईकर आदी उपस्थित होते. जीसीईटी परीक्षेत सर्वाधिक ५0६६ विद्यार्थ्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्री, ३४४९ विद्यार्थ्यांनी मॅथेमॅटिक्स, ३८१५ जणांनी बायोलॉजी हा विषय घेतला होता. प्रश्नपत्रिका ७५ गुणांची असते. फिजिक्समध्ये सर्वाधिक ७0, केमिस्ट्रीमध्ये ६९, मॅथेमॅटिक्समध्ये ७५ तर बायोलॉजीमध्ये ६७ गुण प्राप्त करण्यात आले. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी फिजिक्स व मॅथेमॅटिक्स हे विषय घेतात तर वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी हे विषय घेतात. चार दिवसांत निकालपणजी व फोंड्यातील प्रत्येकी दोन व अन्य ९ मिळून एकूण १३ केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. सत्तरीतील विद्यार्थ्यांसाठी साखळी हायर सेकंडरी व बार्देसमधील विद्यार्थ्यांसाठी आसगाव येथील डीएमसी कुशे महाविद्यालय अशी दोन नवी केंद्रे या वेळी होती. या वर्षीही केवळ चार दिवसांतच निकाल जाहीर करण्यात आला. उत्तरपत्रिका इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ‘स्टॅण्डर्ड आॅप्टिकल स्कॅनर’वर तपासण्यात आल्याचे आयआयटीचे (मुंबई) प्राध्यापक एस.एस. मेजर यांनी सांगितले. या परीक्षा घेण्यात आयआयटी सहकार्य करते. (पान २ वर)