शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रकल्पाला

By admin | Updated: July 20, 2015 01:09 IST

पणजी : येथील हिरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस नियोजित कचरा प्रकल्पाच्या नावाने मोठ्या प्रमाणात खारफुटींची कत्तल झाल्याचा तसेच सीआरझेडचे सर्व नियम

पणजी : येथील हिरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस नियोजित कचरा प्रकल्पाच्या नावाने मोठ्या प्रमाणात खारफुटींची कत्तल झाल्याचा तसेच सीआरझेडचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप असूनही गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या ११८व्या बैठकीत या प्रकल्पाला सशर्त परवानगी दिली. ३५५५ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प होणार आहे. सुका कचरा वेगळा काढण्याचे काम तसेच जैविक कंपोस्टिंग केंद्र उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी खारफुटींची कत्तल झाल्याचे तसेच मातीचा भराव टाकल्याचे निरीक्षण प्राधिकरणाच्याच तांत्रिकी अधिकाऱ्याने याआधी नोंदवले होते. असे असतानाही प्रकल्पाला क्लीन चिट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या जागेत पूर्णपणे कुंपण घालावे तसेच कचऱ्याची घाण वाहून नदीत येऊ नये आणि खारफुटींचीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली जावी, असे प्राधिकरणाने बजावले आहे. तसे हमीपत्र महापालिकेने द्यावे लागेल. महापालिकेसाठी मेसर्स शिल्पी कन्स्ट्रक्शन कंपनी काम करीत आहे. जागरूक नागरिकांनी हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादासमोर आणले असून २१ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीनेत कोटवाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी २00८ मध्येच भू-रूपांतर सनद मिळालेली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नगर नियोजन खात्याचेही आवश्यक ते परवाने आहेत. मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाच्या बांधकामासाठी सीआरझेड, वन खाते तसेच जैवविविधता मंडळाने सुमारे ३५0 खारफुटी कापण्याची परवानगी दिलेली आहे. काही खारफुटी त्यातीलही असण्याची शक्यता आहे. या कचरा प्रकल्पासाठी अटी घालूनच परवानगी दिली आहे. महापालिकेने गेल्या २३ जून रोजी या प्रकल्पाबाबत सर्व्हे आराखडा प्राधिकरणाला सादर केलेला आहे. (प्रतिनिधी) क्लीन चिटमुळे आश्चर्य!