शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात उद्या मध्यरात्री मासेमारीबंदी उठणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 17:50 IST

गोव्यात ६१ दिवसांची मच्छीमारीबंदी उद्या सोमवारी मध्यरात्री उठणार असली तरी पावसाळ्यात गावी गेलेले खलाशी अजून परतलेले नसल्याने बहुतांश ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहण्याची शक्यता आहे

पणजी, दि. 30 - गोव्यात ६१ दिवसांची मच्छीमारीबंदी उद्या सोमवारी मध्यरात्री उठणार असली तरी पावसाळ्यात गावी गेलेले खलाशी अजून परतलेले नसल्याने बहुतांश ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहण्याची शक्यता आहे. मालिम जेट्टीवरील बहुतांश खलाशी अजून फिरकलेले नाहीत, त्यामुळे खरा मोसम दहा ते पंधरा दिवसांनीच सुरू होणार आहे. मांडवी फिशरमेन्स को. ऑप सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक मिनीन आफोंसो म्हणाले की, पावसाळ्यात गावी गेलेले ओडिशा, झारखंड, कर्नाटकचे खलाशी अजून परतलेले नाहीत, त्यांना आणखी पंधरवडा तरी जाईल. यंदा या खलाशांच्या गावात उशिरा पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे त्यांची शेतीची कामे अजून पूर्ण झालेली नाहीत. ती पूर्ण झाल्यानंतरच येणार असल्याचा निरोप काही खलाशांनी दिला आहे. मिनीन म्हणाले की, समुद्रात मासेमारीसाठी जाण्याकरिता अत्यंत चांगले हवामाने आहे, परंतु खलाशी गावाहून परतलेले नाहीत. मालिम जेटी ही गोव्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेट्टी असून, येथे ३२0 ट्रॉलर्स आहेत. खलाशांअभावी ९५ टक्के ट्रॉलर्स सोमवारी किना-यावरच राहतील. अवघ्या १0 ते १५ ट्रॉलर्सनीच मासेमारीसाठी जाण्याची सज्जता केली आहे. गोव्यात ट्रॉलर्सवर परराज्यातील खलाशांचा भरणा आहे. मान्सून सुरू होण्याआधी ट्रॉलर्स किना-यांवर आणले की हे खलाशी आपापल्या गावी जातात आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच परततात. खलाशांची समस्या ही ट्रॉलरमालकांसाठी नेहमीचीच झालेली आहे. त्यामुळे कायद्याने ३१ जुलै रोजी मासेमारीवरील बंदी उठली तरी प्रत्यक्ष मासेमारीला नारळी पौर्णिमेनंतरच वेग येतो. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकमधून बंदीकाळातही ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत येतात आणि मच्छीमारी करतात, असा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून नेहमीच केला जातो, त्यामुळे या शेजारी राज्यांमध्येही मासेमारी बंदीचा काळ समान असावा, अशी मागणी आहे.