शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गव्याला मोेलेत जीवदान

By admin | Updated: May 17, 2017 02:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात तब्बल तीन दिवस अडकून पडलेल्या गव्याला वन अधिकाऱ्यांच्या पथकाने अथक

लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात तब्बल तीन दिवस अडकून पडलेल्या गव्याला वन अधिकाऱ्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन सुखरूप सोडविले. ही घटना धाट फार्म-मोले येथे घडली. क्षेत्रीय वन अधिकारी प्रकाश सालेलकर व दामोदर सालेलकर यांच्यासह फॉरेस्ट गार्ड अर्जुन गावस, विश्वास मांद्रेकर व विश्वास नाईक हे ड्रायव्हर, माहूत आफ्रोज शेख यांनी हे प्रशंसनीय काम केले.अज्ञातांनी रानडुकराच्या शिकारीसाठी धाट फार्म येथील संदीप व्यंकटेश आजरेकर यांच्या मालकीच्या वन क्षेत्रात फास लावला होता. दुर्दैवाने या फासात गवा सापडला. ही माहिती आजरेकर यांना कळल्यावर त्यांनी वन खात्याला कल्पना दिली. खात्यातर्फे गव्याला वाचविण्यासाठी म्हादई अभयारण्यात कामगिरी बजावणारे क्षेत्रीय वन अधिकारी प्रकाश सालेलकर यांना सोमवारी रात्री ९ वाजता फोनवरून माहिती देण्यात आली. प्रकाश सालेलकर यांनी बोंडला अभयारण्यातील क्षेत्रीय वन अधिकारी दामोदर सालेलकर यांना माहिती दिल्यानंतर तेथून वैद्यकीय साहित्यासह सर्वजण धाट फार्म येथे दाखल झाले. गवा फासात अडकलेला होता. त्याची परिस्थिती पाहिल्यास तो किमान तीन दिवस त्यामध्ये अडकलेला असावा. पाण्याविना तो ‘डिहायड्रेट’ झाला होता. त्यामुळे त्याला बेशुद्ध करून सोडविण्याची उपाययोजना धोक्याची होती. त्याच परिस्थितीत साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ‘आॅपरेशन रेस्क्यू’ सुरू करण्यात आले. त्यात पहाटे अडीज वाजता यश आले. गव्याला सुखरूप सोडविण्यात आले. सुटल्यानंतर हिंसक बनण्याचीही त्याची परिस्थिती नव्हती. उलट त्याला वन कर्मचाऱ्यांनी भरपूर पाणी पाजले. नंतर तो त्याच भागातील जंगलात निघून गेला, असे सालेलकर यांनी सांगितले. आणखी चार-पाच तास गवा त्याच परिस्थितीत राहिला असता, तर कदाचित त्याचा जीव धोक्यात आला असता, असे ते म्हणाले.