शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधितांच्या शाळा प्रवेशाबद्दल शुक्रवारी निवाडा

By admin | Updated: September 16, 2014 01:22 IST

ग्रीनगोवा फाउंडेशनचा अर्ज : मानवी हक्क आयोगाची स्वेच्छा याचिका

मडगाव : एचआयव्ही बाधित मुलांना शाळेत प्रवेश नाकारल्याबद्दल मानवी हक्क आयोगाने रिवणच्या फातिमा हायस्कूलविरुध्द दाखल करून घेतलेल्या स्वेच्छा याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी निवाडा दिला जाणार आहे. या प्रकरणात आयोगासमोर संपूर्ण घटनाक्रम सादर झालेला नाही, असा दावा ग्रीनगोवा फाउंडेशन संस्थेने केलेला आहे. तसेच निवाड्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे. आश्रमातील २७ मुलांना रिवण येथील फातिमा हायस्कूलमध्ये सामावून घेण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर या आश्रमातील एचआयव्ही बाधीत १३ मुलांना अन्यत्र हलविले होते. एचआयव्ही बाधितांसंदर्भातील माहिती उघड केल्यामुळे या घटनेची मानवी हक्क आयोगाने दखल घेतली होती. या संदर्भात सुनावणी चालू होती. ही सुनावणी जरी पूर्ण झाली तरी संपूर्ण माहिती आयोगासमोर उघड झालेली नाही, असे या फाउंडेशनचे मत आहे. नित्य सेवा निकेतनच्या प्रमुख संचालक सिस्टर आफोंसा कोराथूर या या घटनाक्रमातील महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. तरीही अजून त्यांचीही साक्ष आयोगाने घेतली नाही, याकडे फाउंडेशनने लक्ष वेधले आहे. या प्रकरणात नित्य सेवा निकेतनासह गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था या संस्थानाही वादी करून घेण्याची गरज असल्याचे या अर्जात म्हटले आहे. यापुढे असे प्रकार होणार नाहीत आणि एचआयव्ही बाधित मुलांना शाळेत प्रवेश नाकारण्यात येणार नाही, अशी हमी फातिमा हायस्कूलकडून नित्य सेवा निकेतनला देण्याची गरजही अर्जात व्यक्त केली आहे. या शाळा भरतीच्या प्रकरणाने जून व जुलैमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. एचआयव्ही बाधित मुलांना सामान्य मुलांबरोबर वर्गात सामावून घेवू नये यासाठी गावच्या लोकांनी फातिमा हायस्कूलवर दबाव आणल्याने शेवटी या प्रकरणात शिक्षण खात्याला मध्यस्थी करावी लागली होती. (प्रतिनिधी)