शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सेनानी रानडे यांच्या अस्थींचे गोव्यातील मांडवी नदीत विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 19:53 IST

स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या अस्थींचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी पणजीतील मांडवी नदीत विसर्जन करण्यात आले.

पणजी : स्वातंत्र्य सेनानी मोहन रानडे यांच्या अस्थींचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी पणजीतील मांडवी नदीत विसर्जन करण्यात आले. रानडे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी गेल्या आठवडय़ात पुणे येथे निधन झाले. रानडे यांनी गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी सशक्त लढा पुकारला होता. आझाद गोमंतक दलाचे ते सदस्य होते. सांगलीला जन्मलेले रानडे हे गोव्यात शिक्षक म्हणून आले व गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी भाग घेतला. बेती येथील पोलीस स्थानकावर त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पोर्तुगीजांनी त्यांना पकडले व प्रथम आग्वादच्या तुरुंगात तर नंतर पोर्तुगालच्या तुरुंगात नेऊन ठेवले होते. गोवा जरी डिसेंबर 1961 साली स्वातंत्र्य झाला तरी, रानडे मात्र त्यानंतरही काही वर्षे पोर्तुगालच्या तुरुंगातच होते. त्यांची सुटका झाल्यानंतर ते गोव्यात येऊन काही वर्षे राहिले होते. मग ते सपत्नीक पुणे येथे गेले. तिथेच त्यांनी देह ठेवला.रानडे यांच्या अस्थींचा कलश बुधवारी पणजीत आणण्यात आला. मुख्यमंत्री सावंत यांनी या कलशाचे स्वागत केले. येथील मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात या अस्थी लोकांच्या दर्शनासाठी दिवसभर ठेवण्यात आल्या. मुख्यमंत्री सावंत आणि इतर काही मंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांनी रानडे यांच्या कार्याचा गौरव केला व गोवा त्यांना कधी विसरणार नाही हे स्पष्ट केले. मांडवी नदीत सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अस्थींचे विसजर्न करण्यात आले. त्यावेळी नगर विकासमंत्री मिलिंद नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. अनेक गोमंतकीयांनी बुधवारी मिनेङिास ब्रागांझा संस्था सभागृहात येऊन रानडे यांच्या अस्थींचे दर्शन घेतले व आपल्या भावनाही व्यक्त केल्या.