शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकुशल कामगारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 02:56 IST

पणजी : भाजप सरकारने किमान वेतनाच्या नावाखाली अकुशल कामगारांची निराशा केली आहे. कामगार संघटनांनी अकुशल

पणजी : भाजप सरकारने किमान वेतनाच्या नावाखाली अकुशल कामगारांची निराशा केली आहे. कामगार संघटनांनी अकुशल कामगारांसाठी किमान वेतन प्रतिदिन ६00 रुपये करावे, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारने केवळ ३0७ रुपये अकुशल कामगारांना वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात सर्व कामगार संघटना पुन्हा चळवळ करणार असल्याचे आयटकचे सचिव ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. वाढत्या महागाईत अकुशल कामगारांना देण्यात येणारे वेतन त्यांच्या मुलभूत गरजा पुरविण्यासाठीही असमर्थ आहे. दिल्लीसारख्या शहरामध्ये अकुशल कामगारांना किमान वेतन ४२५ रुपये देण्यात येते. गोवा सरकारचा हा निर्णय कामगारविरोधी आहे. वेतनाबाबत गोवा सरकारने केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोपही फोन्सेका यांनी केला. वाढती महागाई आणि कमी वेतनामुळे कंत्राटी कामगारांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. कंत्राटी कामगारांवर कंपन्या अन्याय करतात. गोव्यातील झुआरी अ‍ॅग्रो केमिकल कंपनी कामगारांवर अन्याय करत आहे. कामगारांच्या पगारात वाढ केली जात नाही. त्यांना महागाई भत्ता दिला जात नाही. या कंपनीने सुरुवातीला ९0 टक्के गोमंतकीय कामगारांना नोकऱ्या दिल्या जातील, असे सांगितले होते. मात्र, वेतन वाढवावे लागत असल्याने या कामगारांवर कंपनीकडून अन्याय करण्यात येतो, असे फोन्सेका यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगारांच्या मागण्या सरकारने अजून पूर्ण केल्या नाहीत. त्याचप्रमाणे दृष्टी जीवरक्षकांना पर्यटनमंत्र्यांनी अश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. जीवरक्षकांनी संपावेळी केलेल्या मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री परुळेकर यांनी दिले होते. मात्र, जीवरक्षकांची एकही मागणी अजून पूर्ण करण्यात आली नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनीही याकडे गंभीरतेने लक्ष घातले नसल्याचे फोन्सेको म्हणाले. (प्रतिनिधी)