शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चौघांच्या कुटुंबाला आता मोफत पाणी

By admin | Updated: September 13, 2014 01:25 IST

पणजी : राज्यातील प्रत्येक चार सदस्यीय कुटुंबास प्रतिमहिना दहा क्युबिक मीटर पाणी नळाद्वारे मोफत देण्याचा विचार सरकारने चालविला आहे.

पणजी : राज्यातील प्रत्येक चार सदस्यीय कुटुंबास प्रतिमहिना दहा क्युबिक मीटर पाणी नळाद्वारे मोफत देण्याचा विचार सरकारने चालविला आहे. त्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. येत्या पंधरा दिवसांत बांधकाम खात्याकडून पाण्याची बिले आॅनलाईन पद्धतीने भरण्याची व्यवस्था ग्राहकांसाठी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री ढवळीकर म्हणाले की, नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा अनेकजण अपव्यय करत आहेत. पाणी जेवढ्या प्रमाणात हवे, तेवढ्याच प्रमाणात ते वापरायला हवे. यासाठी प्रत्येक चार सदस्यीय कुटुंबास दहा क्युबिक मीटर एवढे पाणी मोफत द्यावे, असा एक विचार पुढे आला आहे. अजून याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. केवळ चर्चा सुरू आहे. मोफत पाणी दिल्यानंतर दहा क्युबिक मीटरनंतरच्या पाण्यावरील दरात मात्र वाढ करावी लागेल. पूर्ण देशात केवळ गोव्यातच जैका प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्थेबाबतची कामे उत्तम प्रकारे सुरू आहेत. त्यामुळेच जपानने जैकाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पही गोव्याला राबविण्यास मंजुरी दिली आहे, याचा अभिमान वाटतो. जपानचे तंत्रज्ञान आम्ही वापरून एका कळंगुटमध्ये १ हजार बेकायदा नळ कनेक्शन शोधून काढली आहेत. राज्यात एकूण ४७९ एमएलडी पाणी तयार होते. राज्यासाठी एरव्ही ३८० एमएलडी पाणी पुरेसे आहे. ४० टक्के पाण्याचा हिशेबच मिळत नाही. येत्या दोन वर्षांत बेहिशेबी पाण्याचे प्रमाण २० टक्क्यांवर आणले जाईल. पाणीपुरवठा विभागाच्या महसुलात आता सरासरी १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. येत्या मार्चपर्यंत पाणीपुरवठ्याबाबतचे सगळे प्रकल्प पूर्ण होतील. राज्यातील १ हजार किलोमीटर लांबीच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या जलवाहिन्या बदलण्यासाठी ३४५ कोटी रुपयांची योजना आम्ही केंद्र सरकारला सादर केली आहे. येत्या पाच वर्षांत पूर्ण किनारी भाग व शहरे आणि उपनगरे सांडपाणी निचरा व्यवस्थेने जोडली जातील. हे काम महागडे असल्याने ते टप्प्याटप्प्याने केले जाईल. म्हापसा, कळंगुट, मडगावमध्ये ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गोव्यासाठी सांडपाणी निचरा व्यवस्थेबाबतचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. (खास प्रतिनिधी)