शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सेझ जमिनीसाठी लवकरच फॉर्म्युला

By admin | Updated: August 9, 2014 01:24 IST

पणजी : सेझसाठी दिलेल्या जमिनी परत घेण्यासाठी सरकार सर्व पर्यायांचा वापर करेल आणि योग्य फॉर्म्युला काढणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री

पणजी : सेझसाठी दिलेल्या जमिनी परत घेण्यासाठी सरकार सर्व पर्यायांचा वापर करेल आणि योग्य फॉर्म्युला काढणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे आश्वासन दिले. सेझसाठी देण्यात आलेली एकूण ३८ लाख चौरस मीटर जमीन अद्याप ताब्यात घेण्यात आलेली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अडकून आहे. अशा परिस्थितीत या जमिनी मिळविण्यासाठी सरकारकडून काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला होता. या मुद्द्यावर मुख्यमंत्री योग्य तोडगा काढणार असल्याचे उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी त्यांना सांगितले. त्यांच्या या उत्तरावर रेजिनाल्ड समाधानी झाले नाहीत. या प्रकरणात सरकारकडून कोणते ‘डील’ केले आहे याची माहिती सभागृहाला देण्यात यावी, असा प्रश्न त्यांनी केला; परंतु ते कोणत्या डीलची गोष्ट करीत आहेत याची माहिती अगोदर सदस्याने द्यावी, असा प्रतिहल्ला मंत्र्यांनी त्यांच्यावर चढविला. आपण वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे बोलत असल्याचे रेजिनाल्ड यांनी सांगितले; परंतु वृत्तपत्रातील माहिती ही प्रमाण मानली जावू शकत नाही, असे सभापतींनी त्यांना सुनावले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सेझसाठी दिलेल्या जमिनी मिळविण्यासाठी सर्व पर्यायांचा उपयोग केला जाईल, असे सांगितले. मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे याविषयी सविस्तर माहिती आपण देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकार आपला फॉर्म्युला तयार करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेईल काय, असा प्रश्न त्यांनी केला. यावर ज्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे त्यांनाच विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. एवढे सांगून न थांबता त्यांना म्हणजे रेजिनाल्ड यांना विश्वासात घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तुमच्या सरकारकडून हा घोळ केलेला आहे याची आठवणही त्यांना करून दिली. योग्य फॉर्म्युला तयार करून नंतर त्यावर सूचना मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)