शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको व मॅथ्यू दिनिजवर उद्या आरोप निश्चितीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:38 IST

माजोर्डा येथील कॅसिनो मारहाण प्रकरणी गोव्याचे माजी मंत्री माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको व त्यांचे मित्र  मॅथ्यू दिनिज यांच्यावर उदया आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.

मडगाव: माजोर्डा येथील कॅसिनो मारहाण प्रकरणी गोव्याचे माजी मंत्री माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको व त्यांचे मित्र  मॅथ्यू दिनिज यांच्यावर उदया आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे. मागच्या सुनावणीच्या वेळी दोन्ही संशयित न्यायालयात गैरहजर होते, त्यामुळे खटला पुढे ढकलण्यात आला होता.संशयित मॅथ्यू दिनिज यांनी आपल्यावर झालेल्या आरोप निश्चितीला सत्र न्यायालयात यापूर्वी आव्हान दिले होते. 23 ऑक्टोबर रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एडगर फर्नाडीस यांनी हा आव्हान अर्ज फेटाळून लावला होता. 2009 मध्ये पाशेको हे पर्यटन मंत्री असताना  झालेल्या या प्रकरणात मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आश्विनी कांदोळकर यांनी पाशेको व दिनीज या दोघांविरोधात भादंसंच्या 448 (बेकायदा घुसखोरी), 384 (जबरदस्ती करणे) व 506-2 (गंभीर स्वरुपाची धमकी देणे) या गुन्हय़ाखाली आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. या निवाड्याला दिनिज यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.हा आव्हान अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी सरकारी वकील सुभाष देसाई यांनी करताना कनिष्ठ न्यायालयाचा निवाडा सुसंगत व योग्य असून त्यात हस्तक्षेप करण्यास कुठलाही वाव नाही. ही घटना प्रत्यक्ष पहाणारे अनेक साक्षीदार असून त्यामुळे  या खटल्यात सुनावणी घेऊन अभियोग पक्षाला पुरावे सादर करण्याची संधी देणो आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर संशयिताच्यावतीने बाजू मांडताना अॅड. विवेक नाईक यांनी आपल्या अशिलाला या खटल्यात विनाकारण गोवल्याचा आरोप केला होता.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, माजोर्डा बीच रिसॉर्टमधील ‘कॅसिनो ट्रेझर्स’ या कॅसिनोतील अधिकारी अशोककुमार राव यांनी पाशेको व दिनीज यांच्या विरोधात कोलवा पोलीस स्थानकात तक्रार केली होती. 30 व 31 मे 2009 या दरम्यानच्या रात्री दोन्ही संशयितांनी माजोर्डा कॅसिनोत येऊन दंगामस्ती केली व आपल्याला जीवंत मारण्याची धमकी दिली. पाशेको यांनी कॅसिनोचा डिलर रेशम पोखरेल यालाही धमकावण्यास सुरुवात केली. आपण 3.69 लाख रुपये जिंकले असून तेवढी रक्कम आपल्याला देण्याचा तगादा त्यांनी पोखरेल याच्याकडे लावला होता, असे राव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते.

टॅग्स :goaगोवा