शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे माजी सभापती अनंत शेट यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 15:22 IST

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

पणजी : गोवा विधानसभेचे माजी सभापती अनंत शेट (५८) यांचे आज पहाटे गोमेकॉत अल्प आजाराने निधन झाले. गेले सात दिवस ते वैद्यकीय उपचारांसाठी गोमेकॉत दाखल होते. दुपारी त्यांच्या पार्थिवावर मयें येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शेट हे मयें मतदारसंघातून २00७ आणि २0१२ असे दोनवेळा भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन विधानसभेत गेले. १२ जानेवारी २0१६ ते १४ मार्च २0१७ या कालावधीत ते सभापती होते. २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारली.प्राप्त माहितीनुसार सात दिवसांपूर्वी ते बाथरुममध्ये कोसळले तेव्हा त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता.   राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्तराज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, शेट यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. ते तळागाळातील नेते होते. नम्र आणि शालीन स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. राज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि जनतेची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही दु:ख व्यक्त करताना शेट यांचे राज्यासाठीचे योगदान कायम आठवणीत राहील, असे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते, काँग्रेसकडूनही शोक व्यक्तविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही शोक व्यक्त करताना या वृत्ताने आपण सुन्न झालो, असे म्हटले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना कामत यांनी केली आहे.काँग्रेसनेही शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर शोक व्यक्त करताना म्हणतात की, नम्र स्वभावाचे, साधे राहणीमान असलेले व नेहमीच सामाजिक बांधीलकीने वावरणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे.गोवा फॉरवर्डला दु:खगोवा फॉरवर्डनेही शेट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. पक्षाचे संयुक्त सचिव संतोषकुमार सावंत म्हणतात की, ‘शेट यांच्या निधनाने एक चांगला मित्र मी गमावला. पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनीही शेट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.