शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना तब्बल १९ वर्षांनंतर मिळाला न्याय

By admin | Updated: March 6, 2017 19:59 IST

सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवण्यासाठी वर्षांनुवर्षे द्याव्या लागणाऱ्या लढ्याच्या हजारो कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 6 - भारतीय न्यायव्यवस्थेत सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवण्यासाठी वर्षांनुवर्षे द्याव्या लागणाऱ्या लढ्याच्या हजारो कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण  एका राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही न्याय मिळवण्यासाठी तब्बल 19 वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागल्याचे सांगिल्यास त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण अशी एक घटना समोर आली आहे. विधानसभेत जुलै १९९८ मध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकूनही मुख्यमंत्रिपद सोडावे लागलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना तब्बल १९ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला. तत्कालीन राज्यपाल जे. एफ. आर. जेकब यांनी राणे यांचे सरकार बरखास्त करून डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला होता. या बाबतीत राज्यपालांचा निर्णय अंतिम असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी त्या वेळी काँग्रेसमध्ये फूट पाडून राणे यांचे सरकार अल्पमतात आणले, तेव्हा राणे यांना विश्वासदर्शक ठराव घेणे भाग पडले. हा ठराव ते जिंकलेही; परंतु त्याने राज्यपालांचे समाधान झाले नाही. त्यांनी राणे यांना हटवून विली यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा मार्ग सुकर केला होता. राज्यपालांच्या या कृतीला राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. उच्चन्यायालयाने राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला. घटनेच्या कलम १६३ (२) अन्वये राज्यपालांनी वापरलेले अधिकार अंतिम असून न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे उच्चन्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे अनेक वर्षे हा खटला चालला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ असल्यास आणि राज्यपालांनी त्यांचे सरकार बरखास्त केले तर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याची गरज नाही. घटनेच्या कलमातील तरतुदींच्या कक्षेबाहेर जात राज्यपालांनी अधिकारांचा वापर केला तर त्यात हस्तक्षेपाचा किंवा फेरविचार करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे. (प्रतिनिधी)