शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जंगलातील आगीचा धग गोवा विधानसभेत; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल  

By वासुदेव.पागी | Updated: July 27, 2023 12:25 IST

अनेक ठिकाणी भडकलेल्या आगीत एकूण ४८० हेक्टर वनजमिनीत आग भडकल्याचीमाहिती वनमंत्र्यांनी दिली.

पणजी - मे महिन्यात गोव्यातील विविध जंगलात भडकलेल्या आगकांडावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढविला. जंगलातील जमिनीवर बिल्डरलॉबीचा डोळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

या आग दुर्घटना नेसर्गिक किंवां अपघाती नसून मानवीकृत्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते याची आठवण विजय सरदेसाई यांनी सभागृहात वनमंत्र्यांनी करून दिली.  तसेच आमदार कार्लुस फेरेरा यांनी उपप्रश्न विचारताना या अग्नीकांडात बिल्डरलॉबीचा हात आहे का असा प्रश्न केला. कार्लुस यांच्या प्रश्नावर वनमंत्री संतापले. कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप कसे काय करू शकता असा प्रश्न त्यांनीविचारला. त्याचबरोबर या विषयावर काही वृत्तपत्रांनी बेजबाबदारपणे लिखाण करूनलोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला.

अनेक ठिकाणी भडकलेल्या आगीत एकूण ४८० हेक्टर वनजमिनीत आग भडकल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली. त्यात ३०० हून अधिक हेक्टर जमिनी या दाट जंगलाच्या होत्याअसेही त्यांनी सांगतले. 

तुम्ही सांगता ते करणार नाही

वनमंत्री विश्वजित आणि विरोधीपक्षनेते यांची जंगलातील अग्नीकांडाच्या मुद्यावरून बराच वादविवाद झाला. ज्या जंगलात आग भडकली ती जंगले बांधकाम निषिद्धविभागात (एनडीझेड) येतात असे त्यांनी वनमंत्र्यांना सांगितले तेव्हा वनमंत्र्यांनी त्यांना वनखाते हे केंद्रीय वनमंत्रालयाच्या कायद्याने चालत असल्याचे सांगितले. तुम्ही त्याबाहेरचे जर सांगत असाल तर तुमचे काहीच मी ऐकणार नाही असे त्यांनी युरींना सुनावले.