शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मासळी विक्रेत्यांनाही बसला मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 02:26 IST

फोंडा : मद्यविक्री व्यवसायाचा मासळी व्यवसायाशी थेट संबंध येतो. तळीराम मद्यसेवनाबरोबरच रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या मासळीवरही

फोंडा : मद्यविक्री व्यवसायाचा मासळी व्यवसायाशी थेट संबंध येतो. तळीराम मद्यसेवनाबरोबरच रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या मासळीवरही ताव मारतात. त्यामुळे साहजिकच मासळी व्यावसायिकांना बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट हा महत्त्वाचा घटक असतो; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जी ४४0 मद्यविक्री आस्थापने बंद करण्यास भाग पाडले आहे, त्यामध्ये निम्म्याहून अधिक बार, रेस्टॉरंट या घटकांचा समावेश आहे. अशा व्यावसायिकांनी मासळी मार्केटमध्ये शनिवारी पाय ठेवला नाही. साहजिकच मासळी विक्रेत्यांना त्याचा फटका बसला. या व्यावसायिकांकडून दिवसा लाखो रुपयांची मासळी खरेदी केली जाते; परंतु आजच्या दिवशी केवळ काही हजारांचीच उलाढाल झाली. उल्हास नाईक या मासळी विके्र त्याने याबाबत बोलताना सांगितले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट मालकांनी आमच्याकडून जी खरेदी व्हायची ती केली नाही, त्यामुळे बराच माल पडून राहिला. फोंडा शहरातील काही बड्या हॉटेलांनाही या आदेशाचा फटका बसला आहे. मासळी आहे; परंतु मद्यविक्री करणे शक्य नसल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली. काही नामांकित हॉटेलांनी चांगले फॅमिली रेस्टॉरंट म्हणून नाव कमावले आहे अशांना त्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारपासून फोंडा तालुक्यातील ४४0 मद्यविक्रेत्यांची आस्थापने बंद करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांना याबद्दल जाब विचारावा, अशा प्रतिक्रिया बऱ्याच व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.फोंडा तालुक्यातील एकूण ४४0 मद्यविक्री आस्थापनांना सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची झळ बसली आहे. (प्रतिनिधी)