शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मासळी व्यापाऱ्यांना एफडीएकडे नोंदणी, वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहन सक्तीचेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:23 IST

मासळी व्यापा-यांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी तसेच मासळीच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहने वापरण्याच्या सक्तीवर सरकार ठाम आहे.

पणजी : मासळी व्यापा-यांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी तसेच मासळीच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहने वापरण्याच्या सक्तीवर सरकार ठाम आहे. मासळीच्या आयातीवर बंदी घातलेली नाही. परराज्यातील व्यापा-यांना त्यांच्या राज्यात एफडीएकडे नोंदणी करावी लागेल. स्थानिक मासळी व्यापा-यांनाही नोंदणी सक्तीची आहे त्यासाठी पालिका, पंचायतींकडून ना हरकत दाखलेही प्राप्त करावे लागतील. दरम्यान, मासळी तसेच अन्य वस्तू तपासण्यासाठी दक्षिण गोव्यातही प्रयोगशाळा उघडण्यात येईल. पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. मडगांवच्या घाऊक मासळी बाजारातील ३३ व्यापा-यांचे परवाने मागे घेतल्याच्या कृतीचे त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, ‘२ आॅगस्ट रोजी काढलेल्या आदेशाचे सर्व मासळी व्यापा-यांना कठोरपणे पालन करावे लागेल. अन्न सुरक्षा आयुक्त या नात्याने आरोग्य सचिवांना याबाबत अंमलबजावणीचे सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. ते उच्चस्तरीय बैठक घेतील.’विश्वजित म्हणाले की, ‘मासळी व्यापा-यांना नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदत वाढवून दिली तरी प्रतिसाद मिळालेला नाही. कोणीच मासळी व्यापा-याने नोंदणी केलेली नाही. सरकार हमीपत्र वगैरे काही घेणार नाही. प्रत्येक मासळी व्यापा-याला वरील आदेशाप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वें पाळावीच लागतील.’ 

नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई हे याबाबतीत आपल्या संपर्कात आहेत. दक्षिण गोव्यातही प्रयोगशाळा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही जागा शोधत आहेत. क्वालिटी इन्स्पेक्शन एजन्सी ही आंतरराष्ट्रीय यंत्रणा केेंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या सहयोगाने उत्तर गोव्यात प्रयोगशाळा उघडणार आहे. तशीच प्रयोगशाळा दक्षिण गोव्यातही उघडली जाईल. केवळ मासळीच नव्हे तर भाजीपाला, फळे, दूधही तपासले जाईल. राज्यात रोज सुमारे १ लाख १५ हजार लिटर दुधाच आयात होते. भेसळ तपासण्यासाठी दुधाचेही नमुने एफडीएकडून वरेचवर घेतले जातात. ही तपासणी चालूच आहे त्यामुळे कोणी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही. मासळीच्या बाबतीत विरोधी पक्ष राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

‘सध्या तरी पर्रीकरच मुख्यमंत्री’मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता त्यावर पर्रीकर भाष्य करण्याचा अधिकार पर्रीकर यांच्या कुटुंबियांनाच आहे, असे नमूद करुन त्यांनी बोलण्याचे टाळले. पर्रीकर हे गोमेकॉतील डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबद्दल विचारले असता सध्या तरी पर्रीकर हेच मुख्यमंत्री आहेत, असे ते उत्तरले.

टॅग्स :goaगोवा