शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात मोठ्या पक्षास प्रथम संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 01:45 IST

पणजी : येत्या ११ मार्च रोजी गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्रिशंकू विधानसभा जर अस्तित्वात आली, तर राज्यपालांची

सर्वात मोठ्या पक्षास प्रथम संधीसद्गुरू पाटील ल्ल पणजीयेत्या ११ मार्च रोजी गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्रिशंकू विधानसभा जर अस्तित्वात आली, तर राज्यपालांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरेल. त्रिशंकू स्थितीत सरकार स्थापनेसाठी बोलविण्याची प्रथम संधी ही सर्वात मोठ्या ठरणाऱ्या पक्षास द्यावी लागते. तसा कायदा नसला तरी, १९९६ सालापासून तशी प्रथा असून अजून तरी तशी प्रथा कुणी राज्यपालांनी किंवा राष्ट्रपतींनीही मोडलेली नाही.गोव्यात कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू विधानसभाच अस्तित्वात येईल, असा प्राथमिक अंदाज काही अभ्यासक व जाणकार काढत आहेत. मात्र, आपल्याला बावीस-तेवीस जागा मिळतील असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. भाजपला किंवा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले तर, समस्याच येणार नाही; पण त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर, भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करतील. मग अपक्षांचेही मोल वाढेल व छोट्या प्रादेशिक पक्षांचाही भाव वाढेल. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येते तेव्हा राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षालाच सरकार स्थापनेसाठी प्रथम बोलवायला हवे, अशी सक्ती नाही, असे काही वकिलांचे म्हणणे आहे. जो पक्ष बहुमत सिद्ध करील, असे राज्यपालांना वाटते त्या पक्षाला राज्यपाल प्रथम निमंत्रण देऊ शकतात, असा दावा काहीजणांकडून केला जातो.माजी केंद्रीय कायदा मंत्री तथा कायद्याचे अनुभवी अभ्यासक अ‍ॅड. रमाकांत खलप यांचे म्हणणे मात्र वेगळे आहे. खलप हे मे १९९६ मध्ये अस्तित्वात आलेल्या अकराव्या लोकसभेचे सदस्य होते. ती अकरावी लोकसभा त्रिशंकू होती. कुणालाच त्या वेळी स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. खलप सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की ९६ साली त्यावेळचे भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्याला सरकार स्थापनेसाठी बोलवावे; कारण आपल्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून आलेले आहेत, असा दावा केला होता. आपण बहुमत सिद्ध करू शकतो, असेही वाजपेयी त्या वेळी म्हणाले होते. भाजपला त्या वेळी निवडणुकीत बहुमत मिळाले नव्हते; पण तो पक्ष सर्वात मोठा ठरला होता. त्या वेळी राष्ट्रपतींनी पहिली संधी वाजपेयी यांना दिली होती; पण वाजपेयी संसदेत बहुमत सिद्ध करू शकले नव्हते हा वेगळा मुद्दा झाला.खलप म्हणाले, की आपले व्यक्तिगत मत असे की, गोव्यात भाजपला बारापेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाहीत. काँग्रेसला पंधरा किंवा सोळा जागा मिळतील असा आपला प्राथमिक निष्कर्ष आहे.