शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर फेलिक्स दहाल खून प्रकरण ‘फायनल’,  पोलिसांकडे पुरावे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 19:39 IST

तीन वर्षापूर्वी पाटणो-काणकोण येथे गूढरित्या मृत्यू आलेल्या फेलिक्स दहाल या 22 वर्षीय फिनीश युवकाच्या खून प्रकरणात

सुशांत कुंकळयेकर

 मडगाव :  तीन वर्षापूर्वी पाटणो-काणकोण येथे गूढरित्या मृत्यू आलेल्या फेलिक्स दहाल या 22 वर्षीय फिनीश युवकाच्या खून प्रकरणात काणकोण पोलिसांना कुठलेही पुरावे न मिळाल्याने शेवटी काल बुधवारी ही केस बंद करण्यासाठी काणकोण पोलिसांतर्फे काणकोणच्या प्रथम वर्ग न्यायालयात ‘फायनल’ रिपोर्ट सादर करण्यात आला.काणकोणचे पोलीस निरीक्षक  राजेंद्र प्रभूदेसाई यांनी काणकोण न्यायालयात बुधवारी सादर केलेल्या अर्जात ही केस बंद करण्याची अनुमती मागितली आहे. यासंबंधी लोकमतशी बोलताना प्रभूदेसाई म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण खून म्हणून नोंद करुन आम्ही तपास सुरु केला होता. मात्र सदर प्रकरणात खून झाल्याचा कुठलाही पुरावा हाती न लागल्याने आम्ही ही केस बंद करण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. 28 जानेवारी 2015 रोजी पाटणो-काणकोण येथील एका रस्त्यावर फेलिक्स मृतावस्थेत सापडला होता. सुरुवातीला काणकोण पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते. मात्र मयत फेलिक्सची आई मीना फिरहॉनन यांनी पैशांच्या वादातून आपल्या मुलाचा गोव्यात खून झाला असा दावा केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरुन तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर काणकोण पोलिसांनी हे प्रकरण खून म्हणून नोंद केले होते.दरम्यान, काणकोण पोलिसांनी फेलिक्सबरोबर त्यावेळी गोव्यात वास्तव करुन असलेल्या दोन जयपूरच्या युवकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र या चौकशीतूनही पोलिसांच्या काही हाती लागू शकले नव्हते. फेलिक्सच्या आईच्या दाव्याप्रमाणो, याच दोन युवकांकडे फेलिक्सने एका जमीन विक्री प्रकरणाचा व्यवहार केला होता. या व्यवहारातून जो फायदा मिळाला होता त्याचा वाटा फेलिक्सला द्यावा लागेल यामुळेच त्याचा खून करण्यात आला असा वहीम तिने व्यक्त केला होता.दरम्यान, काणकोण पोलिसांनी हे प्रकरण योग्यरित्या हाताळले नाही असा दावा फेलिक्सच्या आईने केला होता. हे प्रकरण गोवा पोलिसांच्या हातातून काढून घेऊन सीबीआयकडे तपासासाठी द्यावे अशी मागणी करणारा अर्ज तिने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता.