शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिला उमेदवार सर्र्वाधिक श्रीमंत

By admin | Updated: March 3, 2016 03:05 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजी पणजी महापालिकेच्या निवडणूक रिंगणातील काही महिला उमेदवार सर्वात श्रीमंत आहेत. अर्थात ही श्रीमंती त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या

सद्गुरू पाटील ल्ल पणजी पणजी महापालिकेच्या निवडणूक रिंगणातील काही महिला उमेदवार सर्वात श्रीमंत आहेत. अर्थात ही श्रीमंती त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या ज्ञात व्यवसायांमधून प्राप्त झाली आहे. काही महिला उमेदवारच उच्चशिक्षित असल्याचेही निवडणूक आयोगाकडील प्रतिज्ञापत्रांवरून स्पष्ट होते. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात ३० प्रभागांमधून शंभरच्या आसपास उमेदवार आहेत. काही पुरुष उमेदवार सातवी व आठवी शिक्षित आहेत. ९० टक्के पुरुष उमेदवार दहावी-बारावी शिक्षित आहेत. केवळ चार टक्के उमेदवार पदवीधर आहेत. तिघा पुरुष उमेदवारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे. त्यांच्यावर पोलीस ठाण्यांत गुन्हे व न्यायालयांत खटले आहेत. सर्व उमेदवारांनी सांपत्तिक स्थिती, शैक्षणिक पार्श्वभूमी, व्यवसायाबाबतची माहिती प्रतिज्ञापत्रामधून दिली आहे. प्रत्येक उमेदवाराचे वार्षिक सरासरी उत्पन्न तीन ते चार लाख रुपये कागदावर दाखविले तरी आहे. काही उमेदवारांचे सरासरी अडीच लाख उत्पन्न दाखविले आहे. प्रभाग क्रमांक पाचमधून लढणाऱ्या नगरसेविका शीतल दत्तप्रसाद नाईक यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न २१ लाख ३७ हजार ५८५ रुपये दाखविले आहे. शीतल नाईकच सर्व उमेदवारांमध्ये सर्र्वाधिक उत्पन्न दाखविलेल्या उमेदवार आहेत. त्यांचे पती दत्तप्रसाद नाईक यांचेही वार्षिक उत्पन्न २१ लाख ३७ हजार ५८५ रुपये दाखविले आहे. शीतल नाईक यांनी शिरोडा येथील कामाक्षी कॉलेजमधून बॅचलर आॅफ होमिओपॅथी, मेडिसीन अ‍ॅण्ड सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे. प्रभाग क्रमांक नऊमधून लढणाऱ्या श्रीमती रुथ फुर्तादो यांचा क्रमांक शीतलनंतर लागतो. त्यांनी वार्षिक उत्पन्न ११ लाख ४१ हजार रुपये दाखविले आहे. त्यांचे पती माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी त्यांचे उत्पन्न ९ लाख ६८ हजार ७१३ रुपये दाखविले आहे. रुथ या एलएलबी शिक्षित आहेत. गौरीश धोंड यांनी त्यांचे व पत्नीचे वार्षिक उत्पन्न प्रत्येकी केवळ २ लाख ८४ हजार रुपये दाखविले आहे. गौरीश पदवीधर आहेत. सोरया मखिजा पिंटो या महिला उमेदवार बीए शिक्षित आहेत. त्यांच्याकडे पत्रकारितेतील मास्टर्स डिप्लोमा आहे. प्रभाग क्रमांक बारामधून लढणाऱ्या माजी महापौर वैदही नाईक या बीकॉम शिक्षित आहेत. त्यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये दाखवले आहे. लता यतीन पारेख (प्रभाग चौदा) यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख ७९ हजार आहे. (संपत्तीचा तपशील पान ४)