शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री मांद्रेकरांची भीती व्यर्थ

By admin | Updated: May 28, 2016 02:44 IST

पणजी : सांस्कृतिक ग्रेस मार्कांच्या बाबतीत कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरले आहे.

पणजी : सांस्कृतिक ग्रेस मार्कांच्या बाबतीत कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरले आहे. निकाल जास्त लागणार आणि अ‍ॅडमिशनच्या अडचणी आणखी वाढणार, ही त्यांची भीती व्यर्थ आहे. तसेच सर्वांना शिक्षण ही संकल्पना पुढे न्यायची असेल तर शिक्षणाच्या सुविधा वाढल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले जात आहे. शिक्षणतज्ज्ञ नारायण देसाई म्हणाले की, प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करणे ही सरकारची जबाबदारी आहे तेथे हात झटकून चालणार नाही. शिक्षणविषयक जे राष्ट्रीय धोरण आहे त्यात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याचा अंतर्भाव आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी नैसर्गिक गुण असतात त्याला शिक्षणाच्या माध्यमातून वाव मिळावा, असा याचा अर्थ आहे. खेळाडूंना जर क्रीडा गुण दिले जात असतील तर कला व सांस्कृतिक क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सांस्कृतिक ग्रेस मार्क मिळायला हवेत. माजी प्राचार्य सुरेंद्र सिरसाट म्हणाले की, निकाल जास्त लागेल याची भीती सरकारने बाळगण्याचे कारण नाही. मुलांच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना किती सवलती देता येतील हे पाहावे. क्रीडा गुणांच्या धर्तीवर सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या मुलांचीही कदर व्हायला हवी, त्यांना ग्रेस मार्क मिळायला हवेत. निकाल जास्त लागण्यास अन्य कारणेही आहेत. अनेकदा मुलांना अंतर्गत २0 गुण पैकीच्या पैकी दिले जातात, त्यामुळेही निकाल वाढतो. दुसरी बाब म्हणजे सरकार सर्वांनाच नोकऱ्या देऊ शकत नाही. कलेत करिअर करून एखादा जर पोट भरू शकत असेल तर त्याला उत्तेजन देणे सरकारचे कर्तव्य आहे. त्याची सुरुवात कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊनच व्हावी. करिअर मार्गदर्शक तथा मुख्याध्यापक रामदास केळकर म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रेस मार्कांसाठी विचार व्हायला हवा. रेमोसारखा कलाकार आज नाव कमावून ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बनतो. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळायला हवा. (प्रतिनिधी)